नागपुरात Cyber Crimeचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश?
नागपुरात Cyber Crimeचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश? Saam Tv

नागपुरात Cyber Crimeचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश?

नागपूरात साडेपाच वर्षात फक्त 22 टक्केच गुन्ह्यांचा उलगडा!

संजय डाफ

नागपूर : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये Cyber Crime वाढ होत आहे. नागपूरात गेल्या Nagpur साडेपाच वर्षात साडेआठशे हुन अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. मात्र, फक्त 22 टक्केच गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यामुळं सायबर गुन्हेगार अत्यंत शिफातीने नागरिकांची फसवणूक करत असून पोलिसांवर वरचढ होत असल्याचं दिसतं आहे.

हे देखील पहा-

माहितीच्या अधिकारातून ही माहिती पुढं;

माहितीच्या अधिकारातून RTI ही माहिती पुढं आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी 2016 ते 2021 या कालावधीत किती सायबर गुन्हे घडले, किती गुन्ह्यांचा उलगडा झाला आणि किती आरोपींना अटक केली, असे प्रश्न विचारले होते. यातून धक्कादायक माहिती पुढं आली आहे. पावणेसहा वर्षांच्या काळात 793 सायबर गुन्हे घडले. यातील फक्त 229 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं. तर 169 आरोपींना अटक करण्यात आली.

नागपुरात Cyber Crimeचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश?
"...ही समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी"; मलिकांच्या आरोपांचं नवं ट्विट

यात गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन फसवणूक, ऑनलाईन बँकिंग, ओटीपी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली आहे. सायबर गुन्हेगारांचं धाडस वाढत चाललं आहे. मात्र, या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात कुठंतरी पोलिसांना कमी यश मिळत असल्याचं दिसतं आहे. सायबर गुन्हेगार पोलिसांवर वरचढ होत असल्याचं चित्र आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com