NCP Corporator Son Arrested: NCP नगरसेवकाच्या मुलास अटक; कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचा ठपका

Faizan Rakhange News: फैजान रखांगे याचे वडील विद्यमान नगरसेवक तसेच दापोली अर्बन बँकेचे ते विद्यमान संचालक आहेत.
Pandharpur News, NCP, Akluj, Solapur NCP Deputy President
Pandharpur News, NCP, Akluj, Solapur NCP Deputy Presidentsaam tv

- जितेश काेळी

Dapoli News : दापोली नगरपंचायतीतील महाविकास आघाडीतील (mva) राष्ट्रवादीचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचा मूलगा फैजान याला रत्नागिरी (ratnagiri) जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

दापोली नगरपंचायतीचे निलंबित कर्मचारी लेखापाल दीपक सावंत याने नगरपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांनाही यापूर्वीच पोलिसांडकूडन अटक करण्यात आली होती. तो सध्या जामीनावरती मुक्त आहे.

Pandharpur News, NCP, Akluj, Solapur NCP Deputy President
Stamp Paper घेण्यासाठीचा नियम बदलला, Pimpri च्या मुद्रांक केंद्रावर नागरिकांची गर्दी; जाणून घ्या नवा नियम

आता याच कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या सुपुत्राचाच नंबर लागल्याने आता पुढचा नंबर कोणाचा याची चर्चा जिल्ह्यात सध्या सुरू आहे. दापोली नगरपंचायतीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

याच प्रकरणात फैजान रखांगे यांच्या खात्यावरती दीपक सावंत यांनी जवळपास तब्बल सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा अधीक रक्कम वर्ग केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Pandharpur News, NCP, Akluj, Solapur NCP Deputy President
Kokan News : काेकणात 'Pushpa' स्टाईल चाेरी, लाकडांसह दाेन ट्रक जप्त; राजकीय वर्तुळात खळबळ

आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक फैजान रखांगे यांच्या अटकेसाठी वॉच ठेऊन होते. मात्र फैजान रखांगे गेले काही दिवस भारता बाहेर गेल्याची चर्चा होती. मात्र फैजान दापोलीत येताच त्याला गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाकडून दापोली येथून अटक करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com