चार लाखांच्या बनावट नाेटा सापडल्या; पाेलिस तपास सुरु
Fake

चार लाखांच्या बनावट नाेटा सापडल्या; पाेलिस तपास सुरु

सिंधूदूर्ग : गणेशाेत्सव जवळ आलेला आहे. काेकणवासीय मुंबईहून उत्सवासाठी काेकणात येऊ लागली आहेत. या उत्सव काळात जिल्ह्यात काेट्यावधींची उलाढाल हाेत असते. त्यातच आज कुडाळ येथील भाजी मार्केटच्या बाहेर एका पिशवीत बांधून ठेवलेल्या नोटा पहाटेच्या सुमारास आढळल्या. या नाेटा पाहताच काहींचे डाेळे फिरले. याचे कारण म्हणजे या नाेटा माेठ्या प्रमाणात हाेत्या. पाेलिसांना बाेलविल्यानंतर त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. fake-currency-found-in-kudal-sindhudurg-kokan-news-sml80

गणेशाेत्सव तोंडावर असताना जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल होत असताना बनावट नोटा आढळल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नोटा जप्त केल्या आहेत. सुमारे चार लाख रुपयांच्या या बनावट नाेटा असून पाेलिसांनी नाेटा काेठून आल्या असतील याचा तपास सुरू केला आहे.

Fake
काळजी घ्या! बाप्पाच्या उत्सवानंतर ७ जिल्ह्यात काेविडचे विघ्न

आमदार प्रसाद लाड म्हणाले मी रेल्वे स्थानकात आल्यानंतर पाेलिसांची कुजबुज सुरु हाेती. बनावट नाेटांबाबत ती चर्चा हाेती. गणेशाेत्सव काळात अवैधरित्या नाेटा खपविण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. उत्सव काळात बनावट नाेटांचा सुळसुळाट हाेऊ नये यासाठी गृहमंत्र्यांना तातडीने याेग्य ती पावले उचलण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com