Nanded : तोतया वन अधिकाऱ्याचे पितळ उघड; नांदेड गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Nanded Fake Forest Officer News : कौठा परिसरात वन अधिकाऱ्याचे कपडे परिधान करुन एक जण लाकडाची वाहनं अडवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
Fake forest officer exposed; Action of Nanded Crime Branch Squad
Fake forest officer exposed; Action of Nanded Crime Branch Squadसंतोष जोशी

नांदेड: नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका तोतया वन अधिकाऱ्याचे पितळ उघड पाडण्यात यश आलं आहे. गुन्हे शाखेच्या या पथकाने काल रात्री उशिरा ही कारवाई केलीय. कपिल पाईकराव असं तोतया (Fake) वन अधिकाऱ्याचं (Forest Officer) नाव आहे. कपिल पाईकराव हा मुळचा हदगाव तालुक्यातील निवघा बाजारचा रहिवासी आहे. तो सध्या नांदेडच्या (Nanded) असदवन परिसरात राहत आहे. कौठा परिसरात वन अधिकाऱ्याचे कपडे परिधान करुन एक जण लाकडाची वाहनं अडवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. (Fake forest officer exposed; Action of Nanded Crime Branch Squad)

हे देखील पाहा -

Fake forest officer exposed; Action of Nanded Crime Branch Squad
Nashik : घशात अडकलेले नाणे बाहेर काढले; १२ वर्षीय मुलीला डॉक्टरांनी दिले जीवनदान

पोलिसांनी कपिल पाईकरावला तुम्ही कुठे कार्यरत आहेत असे विचारणा केली असता, तो उडवा-उडवीची उत्तरं देऊ लागला. पोलिसांनी वन-विभागात कपिल पाईकराव नावाचा व्यक्ती वन विभागात कार्यरत आहे का? याची चौकशी केली असता असा कोणीही व्यक्ती कार्यरत नाही अशी खात्री झाल्याने पोलिसांनी कपिलला पोलिसी खाक्या दाखवला. त्यावेळी कपिलने आपण अधिकारी नसल्याची कबुली दिली. या प्रकरणी कपिल पाईकराव विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com