चंद्रपूर जिल्हा परिषदेत बनावट नोकरीचे रॅकेट उघड...

या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने चंद्रपूरच्या रामनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तक्रारीची गंभीरतेने दखल घेत ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
चंद्रपूर जिल्हा परिषदेत बनावट नोकरीचे रॅकेट उघड...
चंद्रपूर जिल्हा परिषदेत बनावट नोकरीचे रॅकेट उघड...संजय तुमराम

चंद्रपूर: जिल्हा परिषदेतील विविध विभागात वर्ग -3 च्या नोकरीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची संगणकीकृत स्वाक्षरी वापरून नोकरीचे बनावट आदेश देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने चंद्रपूरच्या रामनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तक्रारीची गंभीरतेने दखल घेत ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला. (Fake job racket exposed in Chandrapur Zilla Parishad ...)

हे देखील पहा -

कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून, युवक मिळेल ते काम करण्यासाठी तयार होत आहेत. याचाच फायदा घेत बल्लारपूर येथील सरदार पटेल वॉर्डातील रहिवासी ब्रिजेशकुमार बैद्यनाथ झा याने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश माथी मारले. जिल्हा परिषदेत या प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया राबविली गेली नसताना 2019-20 या आर्थिक वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार करण्यात आले. हातात नियुक्ती आदेश असल्याने काही दिवसांपूर्वी तीन युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांची भेट घेवून बनावट आदेश दाखविल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. बनावट आदेश देवून फसवणूक झालेले आणखी 20 ते 22 युवक असल्याची माहिती त्या युवकांनीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली.

चंद्रपूर जिल्हा परिषदेत बनावट नोकरीचे रॅकेट उघड...
उभ्या एसटी बसला कंटेनरची धडक, चालकासह प्रवाशी जखमी...

हा फसवणुकीचा प्रकार बल्लारपुरातील झा नामक व्यक्तीने केल्याचेही सांगितले. रामनगर पोलिसांनी झा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत तपास चालविला. अखेर या भामट्याला नागपुरातून अटक करण्यात यश आले असून, पोलिसांनी न्यायालयाकडून त्याची पोलिस कोठडी मिळविली आहे. अशाप्रकारे फसवणूक झालेल्या युवकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासन व पोलिसांनी केले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com