उस्मानाबाद: महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/ आहे.
मात्र कुणी तरी अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट सुरु केली आहे. या वेबसाइटवर पूजा प्रसाद सेवा ही कॅटेगिरी दिली आहे. त्यावर क्लिक केले की, अभिषेक, अलंकार महापूजा, खण -नारळ ओटी पूजा, जागरण गोंधळ, अन्नदान अश्या पूजा येतात. त्यानंतर पे फॉर प्रसाद सेवा म्हणून ऑप्शन येते, त्यावर क्लिक केले की, फोन नंबर मागितला जातो, आणि नंतर फॉर्म भरून पैसे वसूल केले जातात. मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत आणि त्यांची लूट केली जात आहे. या वेबसाइटवर कुणाचाही नंबर नाही.
मात्र गुप्त माहितीनुसार ही वेबसाइट चालवणाऱ्याचा नंबर आम्हाला मिळाला आहे. तो सोबत जोडला आहे. वेबसाइट काढण्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच आजपर्यंत किती रुपयाचा आर्थिक घोटाळा झाला , या आर्थिक घोटाळ्यात कोण कोण गुंतलंय याचा शोध घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत,अशी मागणीही सुभेदार यांनी केली होती.
Edited By: Pravin Dhamale
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.