कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीचाचं मारहाणीत मृत्यू!

घरातील आई,पत्नी आणि मुलांना मारहाण करीत असताना सोडवायला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना लोहारा तालुक्यातील रुद्रवाडी येथे घडली आहे.
कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीचाचं मारहाणीत मृत्यू!
कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीचाचं मारहाणीत मृत्यू!कैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद : घरातील आई, पत्नी आणि मुलांना मारहाण करीत असताना सोडवायला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना लोहारा Lahora तालुक्यातील रुद्रवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे गावातील नागरिक हादरून गेले आहेत.

हे देखील पहा-

येथील चंद्रकांत शिंदे यांने पहाटे अडीच वाजता आपल्या कुटुंबातील वादावादी नंतर घरातील सर्वच सदस्यांना वेळूच्या भरीव काठीने जबर मारहाणीस सुरुवात केली. पत्नी सरोजा शिंदे, आई जिजाबाई शिंदे, मुलगी कावेरी आणि कविता शिंदे मुलगा संतोष शिंदे यांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. यावेळी झालेल्या आरडा-ओरडी नंतर शेजारी असलेले गुलचंद हरिबा शिंदे हे भांडण सोडवायला गेले असता शिवाजी शिंदे यांने त्यांना देखील काठीने मारहाण करीत गंभीर जखमी केले.

या मारहाणी नंतर गुलचंद बेशुद्ध पडले पडले. यानंतरही आरोपीने घरातील सदस्यांना मारहाण सुरूच ठेवली होती यानंतर घराबाहेर येऊन शेजारील बब्रुवान रंग हराळे यास डोक्यात काठी मारून जखमी केले. या घटनेनंतर नागरिकांनी एकत्र येऊन आरोपीला पकडून घरात कोंडल व तातडीने सर्व जखमींना उपचारासाठी उमरगा येथे पाठविले.

कौटुंबिक वाद सोडवायला गेलेल्या व्यक्तीचाचं मारहाणीत मृत्यू!
संतापजनक: गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार!

यातील बहुतांश जखमीचे प्रकृती गंभीर झाल्याने तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवले आहे. यात जखमी शेजारी गुलचंद हरिबा शिंदे यांचा सोलापूरकडे नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com