Farm Laws Repeal: तानाशाही हरली; शेतकरी एकजुटीचा विजय - बच्चू कडू

येत्या काळात शेतकऱ्यांची लूट थांबवावी आणि योजनेपेक्षा धोरण शेतकऱ्याच्या हिताचे आणावे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
Farm Laws Repeal: तानाशाही हरली; शेतकरी एकजुटीचा विजय - बच्चू कडू
Farm Laws Repeal: तानाशाही हरली; शेतकरी एकजुटीचा विजय - बच्चू कडूSaam Tv

नवी दिल्ली: केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याबाबत घोषणा केली. त्यामुळे लवकरच संसदेतही हे कायदे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी दिली. मोदींच्या या घोषणेनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Farm Laws Repealed: Dictatorship failed Victory of farmer unity - Bachchu Kadu)

हे देखील पहा -

मंत्री बच्चू कडू म्हणाले की, मोदीजींनी तीन कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला हा शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. प्रचंड बलिदानानंतर, जगातलं सर्वात जास्त वेळ चालणारं हे आंदोलन होतं. खासकरुन पंजाबच्या शेतकऱ्यांना मानाचा सलाम करतो, मानाचा मुजरा करतो. मी सुद्धा दुचाकीवरुन या आंदोलनात सहभागी झालो होतो. मोदी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे. ही जी तानाशाही आहे ती शेतकऱ्यांच्या एकजुटीने पार मोडून काढली आहे. याचे परिणाम येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील हे भय मोदी सरकारला आलं आणि त्यातून हा निर्णय झाला. राजकीयदृष्ट्या घेतला असला तरी तो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे, त्यामुळे मी मोदी सरकारचे आभार मानतो.

Farm Laws Repeal: तानाशाही हरली; शेतकरी एकजुटीचा विजय - बच्चू कडू
आता 'ही' मागणी मान्य व्हावी : अजित पवार; 'हुकूमशाह' झुकले : पाटील

येत्या काळात शेतकऱ्यांची लूट थांबवावी. योजनेतून द्यायचं आणि धोरणातून लुटायचं हे सरकारनं बंद केलं पाहिजे. आता आपण तेल आयात केल. सोयाबीनचे भाव पाडण्याचा प्रयत्न तुम्ही केला. त्याच्यामुळे ९ हजार प्रति क्विंटलचं सोयाबीन चार हजार प्रति क्विंटलने शेतकऱ्याला विकावी लागली. ४८ लाख टन तुरडाळ आपल्याकडे तयार आहे, पण तरीही १० लाख टन तुर आयात केली, तुरीचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला, म्हणून योजनेपेक्षा धोरण शेतकऱ्याच्या हिताचे आणावे अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com