देवळालीमध्ये खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न!

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावातील खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
देवळालीमध्ये खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न!
attempt to suicide Saam tv

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा गावातील खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. देवळाली प्रवरा येथील कडू नावाच्या खाजगी सावकाराकडून (Moneylender) सात लाख रुपये व्याजाने घेतले व्याजाचे पैसे अव्वाच्यासव्वा झाल्याने सावकाराने पत्नीच्या नावावर जमीन लिहून घेतली असल्याची माहिती चिठ्ठीत लिहून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा कदम या शेतकऱ्याने प्रयत्न केला. घडलेली घटना जवळच्या नागरिकांना कळताच कदम या शेतकऱ्याला विवेकानंद नर्सिंग होम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

देवळाली प्रवरा येथील तरुण शेतकरी (Farmer) संदीप कदम (वय 33) याने गावातीलच खाजगी सावकार नारायण कडू यांच्याकडून सात लाख रुपये व्याजाने घेतले होते. सात लाखाचे वीस लाख रुपये झाले. देण्यासाठी जवळ पैसे नाही, वडिलांचे छत्र हरवले आणि दोन-तीन महिन्यांपूर्वी आईचं कोरोना मध्ये निधन झालं! घरी विधवा वहिनी आणि भावाची चुती दोन मुलं, जवळ जमीन राहिली नाही. व्याजापोटी सावकाराने साठ गुंठे जमीन लिहून घेतली उरलेल्या पैशाची मागणी केली.

attempt to suicide
Pune : ४० फुटांवरून लोखंडी सळई निसटली आणि १२ वर्षीय मुलाच्या डोक्यावर पडली; मुलाचा जीव धोक्यात !

मात्र, मुदत संपली असल्याने पैसे मिळणार नाही असं सावकाराने सांगितलं. शेती (Farming) शिवाय उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतही साधन नसल्याने चिंतेत सापडलेल्या संदीप कदम या तरुण शेतकऱ्याने आज विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही घटना जवळच्या नागरिकांना कळताच संदीपला तातडीने राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे रुग्णालयात उपचारासाठी (Treatment) दाखल करण्यात आले. संदीप सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

attempt to suicide
बीडमध्ये दरोडा; महिलांच्या अंगावरील दागिने लुटून, पाच जणांना जबर मारहाण!

देवळाली प्रवरा गावामध्ये खाजगी सावकारांच्या मोठ्याप्रमाणात टोळ्या आहेत. यांची देवळाली गावासह तालुक्यांमध्ये मोठी दहशत आहे. अनेकांनी यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आहे. तर काहींनी जीवही गमावला आहे. सावकारांची पोलिसांसोबत (Police) हातमिळवणी असल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी समोर कोणी येत नाही. आता पुन्हा देवळाली गावातीलच तरुण शेतकऱ्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. नारायण कडू या सावकारावर गुन्हा (Case) दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com