वनपरिक्षेत्र कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न!

वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. वन विभगाकडे असंख्य तक्रारी केल्या तरीही दखल न घेतल्याने आज शेतकऱ्याने विषाची बाटली घेऊन वन विभागाच्या मुख्य कार्यलयात दाखल झाला.
वनपरिक्षेत्र कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न!
वनपरिक्षेत्र कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न!संजय जाधव

संजय जाधव
बुलढाणा : वन्य प्राण्यांमुळे जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. वन विभाग Forest Department मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. वन विभगाकडे असंख्य तक्रारी केल्या तरीही दखल न घेतल्याने आज शेतकऱ्याने विषाची Poison बाटली घेऊन वन विभागाच्या मुख्य कार्यलयात दाखल झाला. आमचे शेतातील नुकसान वाचवा अशी करुण झालेल्या नुकसानीची भरपाई द्या अशी मागणी त्याने केली.

यावेळी वन कार्यलयात office एकच गोंधळ उडाला होता. आजच्या आज पंचनामे करा अन्यथा विष प्राशन करण्याची परवानगी द्या अशी मागणी शेतकऱ्याने केली. शेतकऱ्याच्या या भूमिकेमुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

हे देखील पहा-

अंचरवाडी (ता चिखली) येथील शेतकरी व उपसरपंच सुनील परिहार यांच्या 10 एकर शेतीतील सोयाबीन पिकांचे रोह्यानी नुकसान केले. यांच्यासोबत अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वनविभागाकडे तक्रारी करूनही पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने समोरील अनर्थ टळला. यावेळी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे सपोनि अभिजित अहिरराव, पोहेकॉ रवी डुकरे, पोहेकॉ प्रभाकर लोखंडे यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्याला वेळीच रोखले.

वनपरिक्षेत्र कार्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न!
दहावी, बारावीनंतर पुढे काय? करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा

आजच्या आज करणार पंचनामा:
शेतकऱ्याच्या या अनपेक्षित आंदोलनाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली होती. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा गणेश टेकाळे यांनी स्वतः आजच्या आज पंचनामे करण्याचे आश्वासन दिले. वनपरिक्षेत्र अधिकारी यांना पंचनामा करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com