
जितेश कोळी
रत्नागिरी : रत्नागिरीतून एक दु:खद घटना समोर आली आहे. दापोली तालुक्यातील लाडघर येथे झगडेवाडी ते दवंडेवाडी परिसरात लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या परिसरात हा वणवा लागला होता.
अनिल झगडे असं होरपळून दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. अनिल झगडे हे बागेत काम करत असताना वनव्याची आग भडकत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. मात्र आगीमुळे आपल्या आपल्या आवारातील झाडांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलं. (Latest News Update)
वनसंपदा वाचवण्यासाठी ते वणवा विझवण्यासाठी म्हणून धावपळ करू लागले. मात्र या वणव्याच्या आगीच्या भक्षस्थानी अनिल झगडे पडले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोकणातील वनव्यांची समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावरून आता तरी हालचाली होतील का? असा प्रश्न देखील कोकणातील शेतकरी आता उपस्थित करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.