कंधार तालुक्यातील पानशेवडी येथे वीज पडून शेतकरी ठार

कंधार तालुक्यातील गणातांडा येथील दिनेश पवार आणि संदीप पवार हे दोघे भावंड शेती कामासाठी शेतात गेले होते.
कंधार तालुक्यातील पानशेवडी येथे वीज पडून शेतकरी ठार
विज पडून ठार झालेला हाच तो शेतकरी

फुलवळ ( जिल्हा नांदेड) : नांदेड जिल्ह्यात रविवारी (ता. ११) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या दोघां भावंडावर वीज कोसळली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा रुग्णालयात मृत्यूसी झूंज देत आहे. दिनेश केशव पवार (वय २७) असे मयताचे नाव आहे.

हेही वाचा- पत्नीच्या सांगण्यावरुन बाबुराव गायकवाड यांनी घरातील चाकू घेऊन किशन चन्ने यांच्यावर वार केले. यामध्ये किशन गंभिर जखमी होऊन ठार झाला.

कंधार तालुक्यातील गणातांडा येथील दिनेश पवार आणि संदीप पवार हे दोघे भावंड शेती कामासाठी शेतात गेले असता दुपारी अचानक सुरु झालेल्या पावसात आसरा घेण्यासाठी त्यांनी एखा झोपडीचा सहारा घेतला. मात्र तेथेच वीज पडल्याने दिनेश पवार याचा मृत्यू झाला. तर संदीप पवार हा जखमी झाला. जखमी संदीपवर कंधारच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु अशून तो मृत्यूशी झूंज देत आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com