Farmer March : भाऊ गेला तरी माघार नाही, आमच्या मागण्या मान्य करा; मृत कुंडलिक जाधव यांच्या कुटुंबियांची भूमिका

Farmer March News : कुंडलिक जाधव यांचा मृत्यू झाला तरी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
Farmer Kundalik Jadhav Death
Farmer Kundalik Jadhav DeathSaam TV

अभिजित देशमुख, साम टीव्ही

Farmer March Latest News : कांद्याला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफीशी संबंधित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च हा नाशिकहून पायपिट करत मुंबईच्या दिशेने निघाला. सध्या दोन दिवसांपासून मोर्चेकरांचा वाशिंद येथे मुक्काम आहे. (Latest Marathi News)

Farmer Kundalik Jadhav Death
Aadhaar Card Updates : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी; निवडणुकीआधीच मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

दोन दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास कोसळलेला अवकाळी पाऊस सकाळपासून जाणवणारे उन्हाची चटके सोसत हजारो शेतकरी वाशिंद येथे मुक्काम ठोकून आहेत. याच दरम्यान काल नाशिक माऊडी येथील शेतकरी (Farmer) कुंडलिक जाधव यांना संध्याकाळच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागलं.

उलट्या होऊ लागल्याने त्यांना प्रथम उपचार देऊन शहापूर (Shahapur) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या आंदोलनामुळे न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, कुंडलिक जाधव यांचा मृत्यू झाला तरी आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असं देखील त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. तसेच सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी देखील जाधव कुटुंबीयांनी केली.

Farmer Kundalik Jadhav Death
Buldhana News: खळबळजनक! 'अपनी रानी किसी की दीवानी हो गई', स्टेटस ठेवत काँग्रेस शहराध्यक्षाची आत्महत्या

शेतकरी आंदोलनावर ठाम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३५० रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या विधानभवनातील निवेदनानंतरही शेतकऱ्यांच्या लाँगमार्च आंदोलनाचे नेतृत्व करणारे जे.पी. गावीत यांनी आंदोनलावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं 'लाल वादळ' मुंबईत धडकणार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com