शेतकरी महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

धान पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेवर नलूवर वाघाने अचानक हल्ला केला.
शेतकरी महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
tigersaam tv

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे वाघाने शेतकरी महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. धान पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेचा वाघाने (Tiger) हल्ला केला. नलुबाई बाबुराव जांगडे (वय ३५) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे.

घरी तीन मुली व सतत आजारी राहणारा पती या पार्श्‍वभूमीवर तिने हिमतीने धानशेती केली होती. धान शेतीला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेवर नलूवर वाघाने (Tiger) अचानक हल्ला केला. यावेळी महिलेचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतातील ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी वाघाला पिटाळून लावले. या घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनपथक घटनास्थळी दाखल झाले.

वनाधिकार्‍यांनी पंचनामा करून वारसांना  प्राथमिक नुकसान भरपाई दिली आहे. या भागात गेल्या दहा दिवसात वाघाच्या हल्ल्यात दोन मृत्यू झाल्याने कॅमेरा ट्रॅपसह अन्य उपाययोजना करत वाघाला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.