निधीसाठी विहिरीत बसून छेडले आंदाेलन; ११ जणांवर गुन्हा दाखल
farmers protest in well near gondia

निधीसाठी विहिरीत बसून छेडले आंदाेलन; ११ जणांवर गुन्हा दाखल

गोंदिया : भजेपार (ता. सलेकसा) येथे विहिरीत बसून आंदोलन केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रहार संघटनेच्या सहकार्याने विहिरीच्या बांधकामासाठी निधी न मिळाल्याने लाभार्थी शेतक-यांनी हे आंदाेलन नुकतेच छेडले हाेते. farmers protest in well near gondia

धडक सिंचन विहिर योजनेच्या माध्यमातून शेतक-यांनी विहिर बांधकामासाठी निधी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेच्या सहकार्याने दाेन दिवसांपुर्वी भजेपार येथे आंदोलन छेडले आहे. येथील छगन बहेकार यांच्या शेतानजीकच्या पाण्याने भरलेल्या विहिरीत दोरीने पलंग बांधून विहिरीत उतरून आंदोलन केले.

farmers protest in well near gondia
ही शिवसेना नव्हे, साेनिया सेना; दहीहंडी हाेणारच : राम कदम

दरम्यान आंदाेलकांनी परवानगी न घेतल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या काेविड १९ प्रतिबंधक आदेशाचा भंग झाल्याने तसेच पोलिस अधिनियम १९५१ प्रतिबंध आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी सालेकसा ठाण्यात ११ आंदाेलकांवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com