Kolhapur News : कोल्हापुरात शेतकरी आक्रमक; गुळ सौदे पाडले बंद

शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक
Kolhapur News
Kolhapur NewsSaam Tv

रणजित माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातील (Kolhapur) मार्केट यार्ड परिसरात आज शेतकऱ्यांनी गुळ सौदे बंद पाडले. गुळाला हमीभाव मिळावा, तसंच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत.कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील गुळ व्यापार पेठ ही महाराष्ट्रातील (Maharashtra) महत्त्वाची व्यापारपीठ मानली जाते.

Kolhapur News
Shraddha Walker Case : घटनेबद्दल आठवणे कठीण झालंय, कोर्टात कबुली देतानाच आफताब काय काय म्हणाला? वाचा

मार्केट यार्ड मधून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गुळाचा पुरवठा केला जातो. पाडव्यानिमित्ताने कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात गुळ सौदे झाले, या सौद्यांना 5100 रुपये हा दर मिळाला होता. मात्र नंतर हाच दर घसरल्याने तो 3500 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. गुळाला 3700 दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. गेली आठवड्यावर कोल्हापुरातील गुळाला 3200 पर्यंत दर दिला जात होता. गुळाचे दर कमी येत असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी व्यापारी ही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. आज सकाळपासून मार्केट यार्ड परिसरात येणाऱ्या गुळ आणि इतर वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवत शेतकऱ्यांनी गुळ सौदे बंद पाडले. जोपर्यंत गुळाला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत गुळसदे सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे मार्केट यार्ड परिसरात तणाव निर्माण झालेला आहे. या प्रकरणात प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा अशी मागणी आता पुढे येऊ लागलेली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com