Unseasonal Rains: शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; बळीराजाचं दु:ख दाखवताना 'साम'चे प्रतिनिधी डॉ. माधव सावरगावेंना अश्रू अनावर

Chhatrapati Sambhajinagar: साम टीव्हीचे प्रतिनिधी डॉ. माधव सावरगावे वार्तांकन करताना भावुक झाले.
Rain
RainSaam TV

Maharashtra Rains: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेलं पिक आडवं झालं आहे. आधीच संकटांनी चहूबाजूंनी घेरलेल्या शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसानं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

साम टीव्हीचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी डॉ. माधव सावरगावे शेतकऱ्यांच्या बांधावर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते. वार्तांकन करताना ते काहिसे भावुक झाले. शेतातील पिकाचं नुकसान पाहून, बांधावरची परिस्थिती पाहून त्यांनाही अश्रू अनावर झाले. शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या मनातील सध्याच्या भावना काय असतील या विचाराने त्यांना गहिवरुन आलं.

Rain
Nashik News : नाशिकमध्ये गावकऱ्यांनी गावच काढलं विकायला, सरकारवरही केले गंभीर आरोप

संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आता खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर परिस्थितीचा आढावा घेऊन बळीराजाला योग्य करावी अशी मागणीही केली जात आहे. शेतकऱ्यांचं आभारएवढं दुख पाहून मायबाप सरकारला पाझर फुटेल, अशा अपेक्षा आहे.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कुठे हलका तर कुठे मोठ्या सरींची हजेरी लावली. या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. पैठण, गंगापूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा, उन्हाळी बाजरी, कांदाचे मोठे नुकसान आहे. (Latest Marathi News Update)

Rain
Unseasonal Rains: शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला; अवकाळी पाऊस, गारपीटीनं उभी पिकं आडवी

पुणे

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसासोबत गारपीटीनंही झोडपून काढलं आहे. सध्या कांदा, गहू, ज्वारी पिकांची काढणी सुरु असताना अचानक पावसाने हजेरी लावली.अवकाळी पाऊस, गारांमुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली.  

नाशिक

नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील १९१ गावं अवकाळीने बाधित झाली असून सुमारे २ हजार ६८५ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका गव्हाला बसला असून १ हजार ८०३ हेक्टरवरील गहू पिकाचं नुकसान झालं आहे. तर ७७५ हेक्टर द्राक्षाचे आणि ६५ हेक्टरवरील कांद्याचं नुकसान झाले आहे. तसेच ३७ हेक्टरवरील भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. कृषी विभागां ही प्राथमिक आकडेवारी जारी केली आहे. काही ठिकाणी पावसासोबत गारपीटही झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com