फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा करा; शेतकऱ्यांची मागणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या विम्यापोटी राज्यातील शेतकऱ्यांना खर्चाचे पैसे तरी मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यातही शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं दिसून येत आहे.
फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा करा; शेतकऱ्यांची मागणी
फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा करा; शेतकऱ्यांची मागणीडॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या विम्यापोटी राज्यातील शेतकऱ्यांना खर्चाचे पैसे तरी मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यातही शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम पडू लागली आहे. मात्र या विम्याच्या रकमेमुळे शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

हे देखील पहा -

विम्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेत किमान खर्च तरी निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. मात्र शेतकऱ्यांना इफको टोकियो कंपनीकडून एका एकराला १ हजार ते अडीच रुपये मिळत आहे. ही मदत म्हणजे नांगरणी, कोळपणीचा खर्चही न निघणारी आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इफको टोकियोसोबत मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढला आहे. त्या कंपन्याकडून विम्यापोटी मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांचे किमान नुकसान भरून निघणारी असावी, यासाठी सरकारने पाऊल टाकावीत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. नाहीतर नांदेड जिल्ह्यात इफको टोकियो ही कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करते, तेच इतर कंपन्याही करतील अशी भीती आहे.

फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा करा; शेतकऱ्यांची मागणी
Bihar: सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू

मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३६ लाख ५२ हजार हेक्‍टरवरील खरीप पिकांसोबतच फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यात जवळपास ४७ लाख ७४ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. त्या सर्व शेतकऱ्यांची भिस्त ही विम्यावर आहे. विमा कंपनीकडून नुकसान झालेली रक्कम मिळाली तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. मात्र विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याने राज्य सरकार विमा कंपनीवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com