ठाणे जिल्ह्यातील शेतकरी राज ठाकरे यांची भेट घेणार, 'हे' आहे कारण...
ठाणे जिल्ह्यातील शेतकरी राज ठाकरे यांची भेट घेणार, 'हे' आहे कारण...प्रदीप भणगे

ठाणे जिल्ह्यातील शेतकरी राज ठाकरे यांची भेट घेणार, 'हे' आहे कारण...

कोल्हापूरमध्ये आणि राज्यातील इतर ठिकाणी बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी शेतकरी आणि चालक आक्रमक झाले आहेत. यासाठी ते राज ठाकरे यांची भेट घेणार आहे.

डोंबिवली : कोल्हापूरमध्ये (kolhapur) आणि राज्यातील इतर ठिकाणी बैलगाडा शर्यती (bullock cart races) सुरू करण्यासाठी शेतकरी (farmers) आणि चालक (bullock cart ridres) आक्रमक झाले आहेत. त्यातच आता ठाणे जिल्ह्यातील शेतकरी हे सुद्धा आक्रमक झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी आणि बैलगाडा चालकांनी मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांची भेट घेतली आहे. बैलगाडा शर्यत पुन्हा सूरु करण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी याबाबतचे पत्र सुद्धा मनसे आमदार राजू पाटील यांना दिले आहे. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकऱ्यांचे आणि बैलगाडा चालकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि याबाबत मी मनसे अध्यक्ष (MNS Chief Raj Thackeray) राजसाहेब ठाकरे यांच्याशी बोलतो आणि आपण त्यांना भेटायला सुद्धा जाऊ असे सांगितले आहे. यावेळी संदीप माळी, सचिन सरनोबत, विलास पाटील, सुनील मुंडे आणि शेतकरी उपस्थित होते. (Farmers have become aggressive to start bullock cart races. For this, they will meet Raj Thackeray.)

हे देखील पहा -

एक देश एक कायदा पाहिजे

याबाबत भाजप पदाधिकारी आणि शेतकरी संदीप माळी यांनी सांगितले की २०१४ पासून आमची बैलगाडा शर्यत बंद आहे आणि आमचा सुप्रीम कोर्टात यासंदर्भात खटला देखील सुरू आहे. तामिळनाडू मधला जल्लीकट्टू खेळ सुरू झाला मध्यप्रदेश, यूपीमध्ये शर्यती सुरू झाल्या आहेत. एक देश एक कायदा पाहिजे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती बंद आणि बाकी राज्यात शर्यती सुरू त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक आमदारांना पत्र व्यवहार करणार आहोत त्यांना सांगणार आहोत की आमचा सुप्रीम कोर्टात खटला सुरू आहे.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडेही मागणी करणार

यासंदर्भातील खटल्यावर तातडीने सुनावणी करण्यास घ्या आणि जेणेकरून बंद असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होतील. त्यासाठी आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट मागितली आहे, तसेच केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडेही मागणी करणार आहोत. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की ह्या शर्यतीत चालू व्हायला पाहिजे. त्याच्यामधील सट्टा किंवा जुगार हा प्रकार चालू असेल तर त्याच्यावर बंधन घालून एक विरंगुळा किंवा मनोरंजन म्हणून बैलगाडा शर्यती सुरू व्हायला काही हरकती नाही असं त्यांच काही लोकांच म्हणणं आहे आणि त्यांची माननीय राजसाहेबांना भेटायची इच्छा आहे.

चारशे वर्षांपूर्वीची परंपरा

बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता खेळ म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाते. बैलांचे संगोपन शेतकरी स्वयं प्रेरणेने व स्वखर्चाने करत असतो. बैलांच्या संगोपनाबाबत शासन स्तरावर आजपर्यंत कोणतीही योजना प्रस्तावित नाही. बैलांच्या प्रदर्शन व शर्यतीवरील बंदीमुळे बैलांच्या काही जाती नामशेष होण्याची भीती आहे.

ठाणे जिल्ह्यातील शेतकरी राज ठाकरे यांची भेट घेणार, 'हे' आहे कारण...
कल्याण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले केमिकल मिश्रित पाणी

शर्यत बंदीमुळे देशी काय बैलांचे उपयुक्तता मूल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच शर्यतबंदी मुळे शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत आहे. ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रे मध्ये बैलांचे प्रदर्शन व शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे. तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यती बाबत कायदा केलेला आहे. याच कायद्याच्या धर्तीवर बैलगाडा शर्यती चालू झाल्या पाहिजेत असे अखिल भारतीय बैलगाडा मालक शर्यत शौकिन दावडी यांच्याकडून सांगण्यात आले.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com