...म्हणून अकोल्यातील शेतकऱ्यांनी फिरवले उभ्या पिकांवरती ट्रॅक्टर!
...म्हणून अकोल्यातील शेतकऱ्यांनी फिरवले उभ्या पिकांवरती ट्रॅक्टर!अँड.जयेश गवांडे

...म्हणून अकोल्यातील शेतकऱ्यांनी फिरवले उभ्या पिकांवरती ट्रॅक्टर!

उदीड पीक फुलोऱ्यावर तर मुग शेंगा आल्यावरती फुलोरा धूवारीने दोन्ही पिकं पूर्णता नष्ट केली आहेत.

अकोला : अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये हाताशी आलेली उडीद आणि मूग पिके फुलोरा धूवारी ने पूर्णता जळून नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच नष्ट झाला आहे त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर रोटावेटर, ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले आहे.Farmers in Akola turn tractors on crops

हे देखील पहा-

अकोट तालुक्यातील सावरा मंचनपूर परिसरातील रंभापूर,मंचनपूर, पुंडा नंदीग्राम, देऊळगाव,वडाळी देशमुख,असेगाव,मिर्झापुर,कवठा,या भागातील पेरणी तीन टप्प्यात होऊनही. मागील वर्षी सोयाबीन चे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांनी उडिद, मुंग कपाशीला प्राधान्यदिले,परंतु शेतकऱ्यांच्या मुळावर निसर्ग कोपल्याने उदीड पीक फुलोऱ्यावर तर मुग शेंगा आल्यावरती फुलोरा धूवारीने दोन्ही पिकं पूर्णता नष्ट केली आहेत.त्यामुळे हिरवेगार झाडे केवळ जनावरांना हिरवा चारा म्हणून बनल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हिरवेगार वाढलेला उदिड दोन ते तीन फूट उंच वाढलेला असताना पाऊस आला व धुवारीमुळे पूर्ण फुल जळून खाक झाले आहे तसेच मुंग शेंगावर आल्यावर कोवळ्या शेंगा पूर्ण वाकळ्या झाल्या आहेत. आता झालेला पाऊस कुठे पिकांना जीवनदायी तर काही पिकांना जीवघेणा ठरला आहे.

दोन दिवसात होत्याचे नव्हते करुण डौलदार हिरवा उडदाचा फुलोरा नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंग झाले आहे. त्यामुळे शेतात ट्रॅक्टर, रोटावेटर फिरवून शेतकरी शेत रिकामी करीत आहेत.

...म्हणून अकोल्यातील शेतकऱ्यांनी फिरवले उभ्या पिकांवरती ट्रॅक्टर!
आदर्श शाळांचा कायापालट करण्यासाठी राज्यमंत्री मंडळाकडून ४९४ कोटींचा निधी!

आता पर्यंत शेतीसाठी करण्यात आलेला खर्च गवत पेरणी,बियाणे, खत फवारणी, इत्यादी मोठा खर्च करूनही शेतकऱ्य़ांची नशिबी निराशाच आली आहे. शासनाने महसूल विभाग व कृषी विभागाने सर्वे करून शासनाकडून मदत मिळवून दयावी व पीक विमा कंपनी ने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com