
- अमर घटारे
Amravati News : अमरावती जिल्हातील टाकरखेडा मोरे ते पांढरी (खानमपूर) या खराब असलेल्या रस्त्या वरून शेतात जात असताना बैलगाडीतून पडून सागर ओंकार सांबसकर (वय ३६) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याच्या आरोप गावकऱ्यांनी केला आहे. (Maharashtra News)
टाकरेखेडा मोरे ते पांढरी हा रस्ता शेतकऱ्याच्या शेतीला जोडणारा मूख्य रस्ता असुन ह्याच रस्त्याने शेतकऱ्यांना पेरणीपासुन ते शेतमालाची वाहतुकीची कामे करावी लागतात. रस्त्याची दुरावस्था पहाता २००८ पासून संबधित शेतकऱ्यांनी अंजनगाव तहसिलदार यांना निवेदने दिली. त्यानंतर २०२३ कालावधीत देखील शेतकऱ्यांनी रस्ता दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते.
सन २००८ ते २०२३ पर्यंत १५ वर्षे निवदने देऊनही निवेदनाला कचऱ्याची पेटी दाखवणाऱ्या प्रशासनामुळेच आज सागरचा बळी गेल्याच्या संतप्त प्रातिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली. सागरच्या मागे आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.