कोरोनाच्या काळात एका शेतकरी मुलाचा मदतीचा हात

कोरोनाच्या कठीण काळात,समाजासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे. टाळेबंदीत अनेकांचे रोजगार गेले,तर बहुतेक जण हे रस्त्यावर आलेत.
कोरोनाच्या काळात एका शेतकरी मुलाचा मदतीचा हात
कोरोनाच्या काळात एका शेतकरी मुलाचा मदतीचा हातदिलीप कांबळे

मावळ : कोरोनाच्या Corona कठीण काळात,समाजासाठी अनेकांनी आपले योगदान Contribution दिले आहे. टाळेबंदीत Lockdown अनेकांचे रोजगार गेले,तर बहुतेक जण हे रस्त्यावर आलेत. मात्र समाजासाठी काहीतरी केले पाहिजे हे ही मनाशी बाळगून कित्येक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात Helping Hands पुढं करून अदृश्य रुपी मदत कोरोना काळात केली आहे. कोणी धान्यवाटप केलं,तर कोणी कपडालत्ता दिला आहे असे अनेक मदतीचे हात पुढें येत असताना एक शेतकरी मुलाने ही यात पुढाकार घेतला आहे.

हे देखील पहा -

या हाताने जल हें तो जीवन हें म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांना शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे महत्वपूर्ण काम केले. संत तुकाराम महाराज यांचे देहूनगरीच्या खालूब्रे गावातील गणेश बोत्रे यांनी पहिल्या लाटेपासून लोकांना पाणी दिले. जिल्हा परिषदेच्या म्हाळुंगे कोविड सेंटरला आत्तापर्यंत लाखो लिटर पाणी पुरवल्यामुळे येथील कोविड सेंटर मधले हजारो ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका यांच्या चेहऱ्यावर ही समाधान दिसून आले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com