Ahmednagar: भाव मिळेना; निदान कांद्यावर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या! शेतकरी पुत्राचे राष्ट्रपतींना भावनिक पत्र...

महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या मुलाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.
 Farmer Son letter To President
Farmer Son letter To PresidentSaamtv

Farmer Son Letter To President: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अलीकडेच ५०० किलो कांदा विकून एका शेतकऱ्याला सगळा खर्च वसून करुन व्यापाऱ्याने अवघे दोन रुपये हातावर ठेवले होते. असेच काही प्रकार राज्याच्या इतर भागांमध्ये घडले होते.

कांदा, कापूस, हरभरा, द्राक्षे यासह बहुतेक पिकांना भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमुळे असंतोष वाढला होता. यामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकरी पुत्राने या परस्थितीला कंटाळून थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच पत्र लिहिले आहे. भाव न मिळणाऱ्या पिकामध्ये रोटर फिरवण्यासाठी प्रति एकर किमान 2 हजार रुपयांचे अनुदान मिळावे, अशी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

 Farmer Son letter To President
Beed News: धक्कादायक! गांजा, सिगारेट, दारू पिण्यासाठी 'तो' चोरायचा मोबाईल; अट्टल आरोपीला अटक

शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा निम्मीही किंमत मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकरी उभ्या पिकामध्ये रोटर फिरवत आहेत. शेतात कोणत्याही पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल तर प्रचंड पैसा खर्च करावा लागत आहे, पण त्यातून मुबलक आर्थिक उत्पन्न मिळत नाही. उत्पादनाला दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी थेट पिकात रोटर फिरवत आहेत.

आता उभ्या पिकांवर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या, अशी मागणी महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे. यासाठी त्याने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmum यांना पत्र लिहिलं आहे. शुभम गुलाबराव वाघ असं या तरुणाचं नाव असून तो अहमदनगर (AhmedNagar) जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवाशी आहे.

शेतकरी पुत्राने पाठवलेले पत्र त्याच्याच शब्दात..

"आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला काही दर मिळत नसल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे 500 ते 600 किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिवरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे,"

"एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रकमे इतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय. त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये."

 Farmer Son letter To President
Jalna News: मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्याचं शोले स्टाइल आंदोलन; दिला आत्‍मदहनाचा इशारा

"आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. कुठलही पीक केलं तरी तिचं अवस्था निर्माण होतेय. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे."

"शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी 2000 ते 2500 रुपये लागतात. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमालचं विकला नाही, तर तिथं शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही."

आज शेतकऱ्यांना 2 रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळतेय, पण तोच कांदा बाजारात सामन्यांना 20 रुपये किलोने विकला जातोय. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे.

आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर 2 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे," असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सध्या या पत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत असून, आता तरी सरकारला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com