दिवाळीच्या दिवशी विषाची बाटली हातात घेऊन शेकडो शेतकरी रस्त्यावर, काय आहे प्रकरण?

शेकडो शेतकरी अर्धनग्न अवस्थेत विषाची बाटली हातात घेवून रस्त्यावर उतरले आहेत, कारण...
Farmers Strike in buldhana
Farmers Strike in buldhanasaam tv

संजय जाधव

बुलडाणा : येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने केली जात आहे. पण सरकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये (farmers strike) तीव्र नाराजी पसरली आहे. बुलडाण्यातही शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दुष्काळग्रस्त भागाची नुकसान भरपाई न मिळाल्याने दिवाळीच्याच (Diwali festival) दिवशी शेकडो शेतकरी अर्धनग्न अवस्थेत विषाची बाटली हातात घेवून रस्त्यावर उतरले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भातील अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. (Farmers strike on road taking poison bottle in hand)

Farmers Strike in buldhana
Nashik News: नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात वादाचा नवा अंक, प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं

मिळालेल्या माहितीनुसार,ओला दुष्काळ जाहीर करून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये (compensation) नुकसान भरपाई द्या. ही मागणी करत दिवाळीच्या दिवशी सकाळी पहाटेपासून अर्धनग्न अवस्थेत विषाची बाटली हातात‌ घेऊन शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे,असा आरोप प्रशांत डिक्कर यांनी सरकारवर केला आहे.

Farmers Strike in buldhana
Crime News : मुलीला 'आयटम' म्हणणं लैंगिक शोषणच; कोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण, तरुणाला दीड वर्षाची शिक्षा

पिकांचे नुकसान होऊनही सरकारने अतिवृष्टीची मदत दिली नसल्याने संतप्त शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत.सरकारने खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना मदतीपासून वंचीत ठेवलं आहे.शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय केल्याने शेतकऱ्यांवर विष पिण्याची वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहेत.ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांना विना अट १०० टक्के नुकसान भरपाई द्या, अशी मागणी यावेळी प्रशांत डिक्कर यांनी सरकारकडे केली आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com