उसाचे पेमेंट न दिल्यास स्वाभीमानी दाखवणार हिसका

साखर कारखाना
साखर कारखाना

अहमदनगर : मागील वर्षी गाळप केलेल्या उसाचे १२४ कोटी रुपयांचे पेमेंट ऊसउत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील कारखान्यांनी दिले नाही. हे पेमेंट तत्काळ देण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक आर. व्ही. जोशी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, की मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस दिला होता. त्यास सहा महिने उलटून व नवीन हंगाम तोंडावर आला असतानाही काही साखर कारखान्यांनी त्यांना अद्याप उसाचे पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. घेतलेले कर्ज, त्याचा हप्ता व त्यावरील व्याज, ही देणी चुकती करण्यासाठी शेतकऱ्यांना तत्काळ पैसे मिळणे आवश्यक आहे.Farmers' union will agitate if sugarcane is not paid

साखर कारखाना
रोहित पवार फडकवणार भगवा, तोही सर्वात उंच!

थकीत रक्कम ठेवणाऱ्या कारखान्यांना यंदाच्या हंगामासाठीचे गाळप परवाने देण्यात येऊ नयेत. आठ दिवसांत या कारखान्यांनी देणी चुकती न केल्यास प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, शेवगाव तालुका उपाध्यक्ष अशोक भोसले, युवाचे उपाध्यक्ष अमोल देवढे, नारायण क्षीरसागर, चंद्रकांत मस्के, बबन बोर्डे, गणेश होळकर, अली सय्यद यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.Farmers union will agitate if sugarcane is not paid

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com