शेतकऱ्यांनो सावधान: रोही प्राण्यांच्या धडकेत हिंगोलीच्या सहाय्यक फौजदाराचा नांदेडात मृत्यू

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगांव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कान्होजी मुकाडे जानेवारी महिन्यात सेनगाव येथून कळमनुरीकडे दुचाकी वाहनावर जात होते.
शेतकऱ्यांनो सावधान: रोही प्राण्यांच्या धडकेत हिंगोलीच्या सहाय्यक फौजदाराचा नांदेडात मृत्यू
हेच ते रोहीच्या धडकेत जखमी होऊन मृत्यू पावलेले एएसआय मुकाडे

हिंगोली : हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी शहराजवळ रोही प्राण्याने दुचाकीस धडक दिल्याने जखमी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कान्होजी मुकाडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (ता. सात) रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील शेतावर काम करणाऱ्या मजूर व शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगांव पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कान्होजी मुकाडे जानेवारी महिन्यात सेनगाव येथून कळमनुरीकडे दुचाकी वाहनावर जात होते. त्यांचे दुचाकी वाहन कळमनुरी शहराजवळ आले असताना अचानक रोही प्राण्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मुकाडे गंभीर जखमी झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिसांनी मुकाडे यांना उपचारासाठी हिंगोली येथील खाजगी रुग्णालयात हलवले. येथे उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना गुरुवारी सुट्टी देण्यात येणार होती. मात्र बुधवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे.

हेही वाचा - नारायण राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर; तेव्हा संजय राऊतांना कळेल..

कान्होजी मुकाडे हे कळमनुरी तालुक्यातील जांब येथील रहिवाशी होते. परभणी जिल्हा पोलिस दलात १९८४ मध्ये ते भरती झाले होते. त्यानंतर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात दाखल झाले. जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी पोलिस ठाण्यात त्यांनी काम केले. त्यानंतर सध्या ते सेनगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. शिस्तप्रिय असलेल्या श्री. मुकाडे यांच्या निधनाने पोलिस दलात तसेच गाव व परिसरात देखील हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com