दुर्दैवी! बापाच्या कारखालीच चिरडून चिमुकल्या लेकाचा अंत

एलबी नगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
दुर्दैवी! बापाच्या कारखालीच चिरडून चिमुकल्या लेकाचा अंत
दुर्दैवी! बापाच्या कारखालीच चिरडून चिमुकल्या लेकाचा अंत Saam Tv

हैदराबाद : एलबी नगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी नकळतपणे आपल्या मुलाच्या अंगावर कार चढवली आहे. (crushed) गाडीखाली चिरडल्याने मुलाचा मृत्यू झाला आहे. (car) या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. (accident video ) हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे देखील पहा-

हैदराबाद मधील मन्सूराबाद जवळील एलबी नगर या ठिकाणी ही दुःखद घटना घडली आहे. वडील कार धुवून अपार्टमेटमध्ये लागत असताना ही घटना घडली आहे. वडिल आपल्या मोठ्या मुलाबरोबर गाडीत बसले होते. दरम्यान त्यांच्या मागोमाग आलेल्या चिमुकल्यांला त्यांनी बघितलेच नाही. तो गाडीच्या आजूबाजूला खेळू लागला होता. यावेळी तो कारच्यासमोर आला आणि अपघात झाला आहे.त्यानंतर कार मागे घेत असताना कार त्या चिमुकल्याच्या अंगावरून गेली असावी, असे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

दुर्दैवी! बापाच्या कारखालीच चिरडून चिमुकल्या लेकाचा अंत
Param Bir Singh : परमबीर सिंह यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 6 तास कसून चौकशी

हा अपघात थोडासा निष्काळजीपणाला कारणीभूत आहे. मुलाचे वडील लक्ष्मण हे संगारेड्डी जिल्ह्यामधील झहीराबादचे रहिवासी होते. ५ वर्षांपूर्वी त्याचा राणीशी विवाह झाला होता. त्यांना एक बाळ आणि एक वर्षाचा मुलगा देखील आहे. लक्ष्मण हे वर्षभरापूर्वी नोकरीनिमित्त कुटुंबासह शहरात स्थलांतरित झाले आहे. लक्ष्मण हा कार चालक म्हणून काम करत आहे, तर त्याची पत्नी मन्सूराबाद मधील एका अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com