धक्कादायक ! पळवून नेलेली मुलगी सापडेना म्हणून बापाची आत्महत्या

शेख रतन शेख नुरमुहम्मद वय 42 रा. सिरसाळा ता.परळी वैजनाथ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
धक्कादायक ! पळवून नेलेली मुलगी सापडेना म्हणून बापाची आत्महत्या
धक्कादायक ! पळवून नेलेली मुलगी सापडेना म्हणून बापाची आत्महत्याविनोद जिरे

बीड: पळवून नेलेल्या मुलीचा विरह सहन न झाल्याने आणि तिच्या तपासात पोलिसांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे, 42 वर्षीय बापाने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली आहे. ही धक्कादायक घटना, बीडच्या सिरसाळा गावात घडली आहे. तर या सर्व प्रकाराला पोलीस प्रशासन जबाबदार असून तपासी अधिकार्‍यांवर कारवाई करा. अशी मागणी घेऊन 200 ते 300 नातेवाईकांनी सिरसाळा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.

शेख रतन शेख नुरमुहम्मद वय 42 रा. सिरसाळा ता.परळी वैजनाथ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेनंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन झालेले प्रेत ताब्यात न घेता आक्रमक पवित्रा घेतला. रतन यांच्या मृत्यूस पोलिस प्रशासन जबाबदार आहे.

धक्कादायक ! पळवून नेलेली मुलगी सापडेना म्हणून बापाची आत्महत्या
अवघ्या दोन लाखांसाठी सावकाराने २५ लाखांची जमीन लुबाडली

मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आणि लवकरात लवकर पळवून नेलेल्या मुलीचा शोध घ्यावा. अशी मागणी घेऊन संतप्त नातेवाईकांनी सिरसाळा पोलिस ठाण्याच्या दारात ठिय्या दिला. दरम्यान सिरसाळा येथे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याने, डिवायएसपी सुरेश पाटील दाखल झाले होते.

यावेळी डिवायएसपी पाटील यांनी मयताचे नातेवाईकांच्या भावना व मागणी समजून घेत, पळवलेल्या मुली प्रकरणी तपास वेगात करण्यात येईल. या प्रकरणी दोषीवर व कर्तव्यात कसूर करणा-यावर कारवाई केली जाईल. असं आश्वासन सुरेश पाटील यांनी, मयताच्या नातेवाईकांना आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांचा जमाव निवळला व प्रेत ताब्यात घेत अंत्यसंस्कार केला. दरम्यान अद्यापही गावात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com