5 दिवसांवरती लग्न असताना मुलगी गेली पळून, बापाने केली आत्महत्या; मुलीला घरात न घेण्याचा दिला बायकोला सल्ला

मुलीचे सर्वांनुमते ठरवलेलं लग्न 19 नोव्हेंबर ला होतं त्यासाठी मुलीच्या वडिलांनी मोठ्या धामधुमीत लग्न करण्यासाठी सर्व तयारी देखील केली होती.
5 दिवसांवरती लग्न असताना मुलगी गेली पळून, बापाने केली आत्महत्या; मुलीला घरात न घेण्याचा दिला बायकोला सल्ला
5 दिवसांवरती लग्न असताना मुलगी गेली पळून, बापाने केली आत्महत्या; मुलीला घरात न घेण्याचा दिला बायकोला सल्लाSaamTV

औरंगाबादः घरच्या लोकांनी ठरवलेलं लग्न (marriage) पाच दिवसांवरती येऊन ठेपलेलं असताना मुलगी अचानक दुसऱ्या मुलाबरोबर पळून गेली मुलीने केलेल्या कृत्यामुळे समाजात आपली बदनामी होणार मुलीच्या वडिलांनी (Girl's Father) स्वत:ला संपवून घेचल्याची दुर्दैवी घटना शनिवारी औरंगाबाद मध्ये घडली आहे. वाहनचालक असलेल्या 48 वर्षीय मुलीच्या वडिलांनी मुलीने केलेल्या कृत्यामुळे आत्महत्या (Sucide) केली मात्र आपल्याच कुटुंबातील कोणा सदस्याची बदनामी होऊ नये यासाठी त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहलेल्या चिठ्ठी देखील लिहली आहे मात्र यामध्ये घरच्या लोकांचा उल्लेख केला नाही.

हे देखील पहा -

म्हणून टोकाचं निर्णय घेलता-

मुलीचे सर्वांनुमते ठरवलेलं लग्न 19 नोव्हेंबर ला होतं त्यासाठी मुलीच्या वडिलांनी मोठ्या धामधुमीत लग्न करण्यासाठी सर्व तयारी देखील केली होती. सर्व पाहुण्यांना आमंत्रणे दिली. हॉल, जेवनाची व्यवस्थाही देखील लावली होती. हे सर्व करत असताना आणि अगदी काही दिवसांवरती लग्न आलं असता मुलगी मात्र दुसऱ्याच मुलाबरोबर पळून गेली. खूप शोधाशोध केल्यानंतर वडिलांनी साताऱ्यातील पोलीस स्टेशनमध्ये (Satara Police Station) मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार केली. मात्र लग्न ऐन तोंडावर आल्यावर मुलीने केलेल्या कृत्यामुळे संर्व कुटुंब तणावाखाली असताना हा धक्का सहन न झाल्याने मुलीच्या बापाने संग्रामनगर (Sangramnagar) येथील उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर झोकून देत आत्महत्या केली.

5 दिवसांवरती लग्न असताना मुलगी गेली पळून, बापाने केली आत्महत्या; मुलीला घरात न घेण्याचा दिला बायकोला सल्ला
बालकास ताेंडात पकडून बिबट्याने ठाेकली धूम; आईने केला पाठलाग

मुलीला माझ्या घरात आता स्थान नाही -

तसेच या घटनेतील मुलीच्या वडीलांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली त्यामध्ये त्यांनी आपल्या बायकोला उद्देशून लिहिलं आहे कि 'मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील, मात्र आता त्या मुलीला माझ्या घरात स्थान नाही' असा मजकुर मृत व्यक्तीने लिहलेल्या चिठ्ठीत सापडला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com