मुलीच्या सासरच्या जाचामुळे वडीलांची आत्महत्या; मृतदेहा शेजारीचं मुलीनेही सोडले प्राण

नांदेड जिल्ह्यातील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!
मुलीच्या सासरच्या जाचामुळे वडीलांची आत्महत्या; मृतदेहा शेजारीचं मुलीनेही सोडले प्राण
मुलीच्या सासरच्या जाचामुळे वडीलांची आत्महत्या; मृतदेहा शेजारीचं मुलीनेही सोडले प्राणसंतोष जोशी

संतोष जोशी

नांदेड: गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी सासर कडून मुलीचा होत छळ पाहून मुलीच्या वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर इथे घडली आहे. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केली, हे दुखः सहन न झाल्याने मुलीनंही प्राण सोडले आहेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

5 लाखाची मागणी साठी तिचा शारिरीक आणि मानसिक छळ;

देगलूर तालुक्यातील सुगाव येथील माधुरी शंकर भोसले हिचा विवाह आठ महिन्यापुर्वी मुखेड तालुक्यातील उंद्री येथील संदीप वडजे सोबत झाला होता. संदीप पुणे येथे कंपनीत नोकरी करत होता. लग्नानंतर पती संदीप आणि सासरच्या मंडळींनी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी 5 लाखाची मागणी माधुरी कडे करत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करत असे.

सासरकडची मागणी पूर्ण करु शकत नाही म्हणून...;

माधुरीने ही बाब वडील शंकर भोसले यांना सांगितली. शंकर भोसले यांनी अगोदरच मुलीच लग्न कर्ज काढून केलं ते कर्ज फिटलं नाही आता पाच लाख कुठून आणू म्हणून चिंतेत होते. काल (ता. १५) रात्री मुलीच्या सासरकडची मागणी पूर्ण करु शकत नाही म्हणून शंकर यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वडीलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचं दुखः माहेरी असलेल्या माधुरीला सहन झाले नाही आणि तिने वडीलांच्या मृतदेहाची शेजारीच प्राण सोडले.

मुलीच्या सासरच्या जाचामुळे वडीलांची आत्महत्या; मृतदेहा शेजारीचं मुलीनेही सोडले प्राण
"...ही समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी"; मलिकांच्या आरोपांचं नवं ट्विट

मृत शंकर भोसले यांच्या पत्नी नं दिलेल्या तक्रारी वरुन पती संदीप वडजेसह माधुरीच्या सासरच्या पाच जणांना विरोधात देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच लाख दिले नाही तर पोटच्या मुलीचं आयुष्य उध्वस्त होईल या भीतीने मृत्यू ला कवटाळणाऱ्या बापासोबत मुलीनंही प्राण सोडल्याची ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. ह्रदय पिळवटून टिकणाऱ्या घटनेस जबाबदार असणाऱ्या माधुरीचा पती आणि सासरच्या मंडळींना कठोर शिक्षा झाली तरचं.. अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com