माणूसकीला काळीमा! पोटच्या मुलीची बापाकडून एकदा नाही, तर तब्बल तीनदा विक्री

बाप, सावत्र आईसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
माणूसकीला काळीमा! पोटच्या मुलीची बापाकडून एकदा नाही, तर तब्बल तीनदा विक्री
माणूसकीला काळीमा! पोटच्या मुलीची बापाकडून एकदा नाही, तर तब्बल तीनदा विक्रीसंतोष जोशी

नांदेड : नांदेड Nanded जिल्ह्य़ात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडील, सावत्र आई आणि २ सावत्र भावांनी मिळून एकदा नव्हे, तर ३ वेळेस एका अल्पवयीन मुलीची विक्री केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव Hadgaon तालुक्यातील वाकडवाडी Wakadwadi येथील सुभाष राठोड हे काही वर्षाअगोदर पत्नी पासून विभक्त झाले आहेत. मात्र, त्यांनी त्यांची मुलगी स्वतः जवळ सांभाळण्यासाठी ठेवली होती.

नंतर सुभाष राठोड ने दुसरे लग्न केले होते. मुलगी वयात येत असल्याचे लक्षात येताच सावत्र आईची नियत फिरली आणि तिने पती आणि २ मुलांच्या मदतीने १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला २०१९ मध्ये राजस्थान Rajasthan या ठिकाणी भावना चावला या महिला एजंटच्या मदतीने विक्री केली. मुलीला गुंगीचे औषध देऊन, २ पुरुषांनी तिच्या वारंवार अत्याचार केला आहे. यामध्ये पिडीता गर्भवती राहील्याने तिला वडीलांच्या स्वाधीन केले.

हे देखील पहा-

२०२० मध्ये सुभाष राठोड हा औरंगाबाद Aurangabad या ठिकाणी वास्तव्यास होता. या कालावधीत पित्याने नंदुरबारच्या Nandurbar संदिप माळीला २ लाखाला आपल्या मुलीला विकले. माळीने देखील ८ महिने पिडीतेचे शोषण करून, परत सुभाष राठोड यांच्याकडे आणून सोडले. सुभाष राठोड एवढ्यावरच थांबला नाही. तर पत्नीच्या त्याने पैश्याच्या हव्यासापोटी मुलीला तिसऱ्यांदा सातारा Satara येथील विठ्ठल गायकवाडला २ लाखाला विकली आहे.

माणूसकीला काळीमा! पोटच्या मुलीची बापाकडून एकदा नाही, तर तब्बल तीनदा विक्री
नात्‍याला काळीमा..चाकूचा धाक दाखवत भाचीवर अत्‍याचार

गायकवाडने लग्नाचा बनाव करुन, तिचा शारिरीक मानसिक छळ करत वारंवार अत्याचार केले आहे. गायकवाडच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन हदगाव या ठिकाणी असलेल्या मावशीचे घर गाठून मावशीला सर्व घडलेला प्रकार सांगितला. आणि पुढे मावशीच्या मदतीने पिडीत मुलीने हदगाव पोलिस Police ठाण्यात सुभाष राठोड, सावत्र आई, दोन भाऊ, आणि अत्याचार करणाऱ्या राजस्थान, सातारा आणि नंदुरबारच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोटच्या मुलीची विक्री करणाऱ्या बापाला, सावत्र आई आणि मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेऊन, बलात्कार करणाऱ्या नराधमांना शिक्षा करण्याची मागणी पिडीतेच्या मावशीने यावेळी केली आहे. मुलगी विक्री प्रकरण आणि अत्याचार प्रकरणात हदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने नांदेड हादरला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com