पाच मुलींच्या खांद्यावरून बापाचा अंत्यविधी समाजासमोर आदर्श; पाहा Video

ही कौतुक करणारी घटना वाळूज परिसरातील तिसगाव म्हाडा कॉलनीतील कासलीवाल फ्लोरा येथे घडली.
अंत्यविधीसाठी खांदा देणाऱ्या पाच बहीणी
अंत्यविधीसाठी खांदा देणाऱ्या पाच बहीणीSaam TV

औरंगाबाद: मुलगा होत नाही असे म्हणून आईच्या गर्भातच निष्पाप कोवळ्या मुलींचा गर्भपात केला जातो. ही मानसिकता थांबावी. आणि समाजात मुलगा-मुलगी एकसमान आहे. असे एक ना उदाहरण बघायला मिळतात. असा एक क्षण वाळूज एमआयडीसीत घडला. भाऊ नसताना पाच मुलींनी आपल्या जन्म दात्या बापाच्या अंत्यविधी यात्रेला खांदा देत पाणी पाजून समाजासमोर एकाप्रकारे आदर्श ठेवला आहे. ही कौतुक करणारी घटना वाळूज परिसरातील तिसगाव म्हाडा कॉलनीतील कासलीवाल फ्लोरा येथे घडली.

येथील रहिवासी आई मिना आणि वडील पुरुषोत्तमजी चंदुलालुजी खंडेलवाल यांचं वयाच्या 72 व्या वर्षी 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी- 8:30 वा वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांचा अंत्यविधी हा विधीवत पद्धतीने करण्यात आला. विशेष बाब म्हणजे त्यांना मुलगा नसताना रेखा , राखी, राणी, आरती आणि पुजा यावेळी वडीलांना खांदा दिला. आपल्याला भाऊ नाही असे म्हणत बसण्यापेक्षा पाचही बहिणीनं मोठी हिम्मत दाखवत जन्यदाता बापाचा शेवटचा अंत्यविधी पार पडला. मुलींच्या या निर्णयाचं परिसरातून कौतुक केलं जातं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com