Video : कोल्हारमध्ये नाचल्या नंग्या तलवारी, परिसरात भीती

कोल्हारमध्ये गुंडांचा धुमाकूळ
कोल्हारमध्ये गुंडांचा धुमाकूळ- Saam Tv

अहमदनगर : राहाता तालुक्यातील कोल्हारमध्ये दोन दिवसांपूर्वी अजब घटना घडली. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने हा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओत नंग्या तलवारी घेऊन विरोधकांवर हल्ला करण्यासाठी काही तरूण वावरताना दिसत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

येथील अंबिकानगर वसाहतीत बुधवारी (ता. २२) रात्री घडलेल्या किरकोळ कारणावरून एका गटाने गुरूवारी सकाळी हातात तलवारी, कुऱ्हाडी व लाकडी दांडके घेऊन एका कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत गावात दहशत पसरविली. Fear in the area due to a dispute between two groups in Kolhar

कोल्हारमध्ये गुंडांचा धुमाकूळ
विखे पाटलांच्या तालुक्यात दुपटीने वाढले बाधित! लसही कोणी घेईना

या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री दहाच्या सुमारास अंबिकानगरमधील एका समाजाच्या अल्पवयीन मुलीला रस्त्याने जाणाऱ्‍या एका तरुणाचा धक्का लागला. त्यानंतर किरकोळ वाद होऊन हे प्रकरण जागेवर मिटलेही. मात्र, रात्री झालेल्या वादाचे पर्यवसान सकाळी पुन्हा भांडणात झाले.

एका गटाच्या टोळक्याने दुसऱ्या गटाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर हातात शस्त्रे व हत्यारे घेऊन दुसऱ्या गटावर धावून गेला. महिलांनाही शिवीगाळ केली. दोन्ही गटांची घरे अंबिकानगरमध्ये एकमेकांजवळ आहेत. घटनेदरम्यान शस्त्रे घेऊन त्या भागात पळापळ सुरू झाल्यामुळे तेथील रहिवासी भयभीत झाले.

पोलिस निरीक्षक समाधान पाटील व पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी फौजफाट्यासह कोल्हारमध्ये दाखल झाले. गावात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी तातडीने हालचाली केल्या. तलवारी व हत्यारे घेऊन एकमेकांवर हल्ला करण्याच्या पवित्र्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिस यंत्रणेने गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई सुरू केली. पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी प्रत्यक्ष येऊन घटनेची माहिती घेतली. त्यांनी गावातील मान्यवर, तसेच दोन्ही गटांतील प्रमुखांसह शांतता समितीची बैठक घेतली. Fear in the area due to a dispute between two groups in Kolhar

समाधान पाटील म्हणाले, या प्रकरणी तक्रारी देण्यास सुरवातीला कोणीच पुढे येत नव्हते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसच फिर्यादी होणार होते. मात्र, त्यानंतर परस्परविरोधी तक्रारी आल्या आहेत. या प्रकरणात कोणीही असले, तरी पोलिस त्यांना पाठीशी घालणार नाहीत. या विषयात पोलिस सतर्क असून, गावकऱ्यांनी भीती बाळगू नये.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com