महिला बौद्ध भिक्खूचा अनैतिक संबंधातून खून!

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पिपळा डाकबंगला येथे अनैतिक संबंधातून महिला बौद्ध गुरूची तिच्याच शिष्याकडून निर्घृणपणे हत्या !
महिला बौद्ध भिक्खूचा अनैतिक संबंधातून खून!
महिला बौद्ध भिक्खूचा अनैतिक संबंधातून खून!मंगेश मोहिते

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पिपळा डाकबंगला येथील शिवली बोधी भिक्खू निवास येथे कोषाध्यक्ष असलेल्या श्रामनेरी बुद्धप्रिया उर्फ कुसुम सुनील चव्हाण या बौद्ध भिक्खूचा तिचा शिष्य भदंत धम्मानंद थेरो उर्फ रामदास झिनुजी मेश्राम याने निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे.

हे देखील पहा :

आरोपी भदंत धम्मानंद थेरो उर्फ रामदास झिनुजी मेश्राम याने मृतक श्रामनेरी बुद्धप्रिया हिच्या गळ्यावर भाजी कापण्याच्या चाकूने सपासप वार केले. नंतर हातोड्याने डोके व चेहऱ्यावर वार केले. आरोपी रामदास यशोधरा नगर अमरावती येथील रहिवासी असून तो विवाहित आहे. त्याला दोन मुले व सुना आहेत. २००७ साली संसाराचा त्याग करून तो भदंत झाला. जवळपास १२ वर्षांपूर्वी मृतक कुसुमशी त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले.

महिला बौद्ध भिक्खूचा अनैतिक संबंधातून खून!
न्यायाधीशाच्या वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार; युवकाची पत्नीही गंभीर!

मागील बारा वर्षांपासून अनैतिक संबंध असलेल्या श्रामनेरी बुद्धप्रिया हीचे दुसऱ्याशी सूत जुळले. त्यामुळे चिडलेल्या भदंत धम्मानंद थेरोने तिचा खून केला. यावेळी आरोपी भिक्खूने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून पोलीसांच्या हवाली केले. मृतक कुसुम विवाहित असून तिला एक मुलगा व मुलगी आहे. मात्र, नवरा दारुडा असल्याने तिने संसाराचा त्याग करून १२ वर्षांपूर्वी श्रामनेर मार्ग निवडला. या दरम्यान आरोपी रामदास याच्याशी कुसुमची ओळख झाली आणि जसे त्यांचे संबंध होते तसाच त्याचा अंत देखील झाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.