Sangli News: सांगलीत एसटी प्रवाशांना लुटणाऱ्या महिला चोरट्यांचा पर्दाफाश; तब्बल ९ लाखांहून अधिक सोन्याचे दागिने जप्त

सर्व दागिन्यांची किंमत तब्बल ९ लाख ५१ हजार ३५० रुपये इतकी आहे.
Sangli News
Sangli NewsSaam TV

Sangli News: गेल्या महिन्यापासून एसटी बसमधील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर लुटमार सुरु होती. अशात सांगली येथील विटा पोलिसांनी या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. एसटी बसमध्ये महिलांची एक टोळी प्रवाशांची लुटमार करत होती. त्यातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींकडून तब्बल ९ लाख ५१ हजार ३५० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. महिलांच्या या टोळीमध्ये आणखीन काही महिलांचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरी (वय वर्षे २८), दिपाली (वय वर्षे २२) या दोघींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही महिला मुळच्या कर्नाटकमधील असून गेल्या काही दिवसांपासून त्या कराडच्या तासवडे गावात राहत होत्या. २६ नोव्हेंबर रोजी विटा पोलीस ठाण्यात चोरीच्या दोन तक्रारी आल्या होत्या.

यात नीता सोमनाथ निकम (वय वर्षे ३४) कराड बसस्थानकावरून गुहागर ते तुळजापूर असा प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. त्यानंतर बायडा अनिल पाटणकर (वय वर्षे ७४) या वृध्द महिलेने देखील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली.

Sangli News
Sangli News : पाेलिसांची माेठा कारवाई; सांगली, सोलापूर जिल्ह्यातून टाेळी हद्दपार

दरम्यान, विटा पोलिसांनी (Police) विटा बसस्थानकातून काही महिलांना संशयितरित्या ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान ईश्वरी आणि दिपाली या दोन महिलांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. कराड येथील राहत्या घरात महिलांनी चोरी केलेले दागिने ठेवले होते.

Sangli News
Gold Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदीचे दरही ५,५००ने वाढले

यात ५ तोळ्याचे सोन्याचे (Gold) हार, ५ तोळे ५ ग्रॅम सोन्याचे गंठण, ७ ग्रॅम वजन असलेल्या लहान मुलीच्या सोन्याच्या बांगड्या, ३ अंगठ्या, ६ ग्रॅमचे एक पॅंडल जप्त केले. या सर्व दागिन्यांची किंमत तब्बल ९ लाख ५१ हजार ३५० रुपये इतकी आहे. पोलीस महिलांच्या या टोळीतील इतर महिलांचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com