Solapur News: गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा; सोलापूरात सदावर्तेंवर संभाजी ब्रिगेडची शाईफेक

Gunratan Sadavarte News: या घटनेचा सदावर्ते यांनी तीव्र निषेध केला आहे. अशा शाईफेक हल्ल्यांनी मी घाबरत नाही असं सदावर्ते म्हणाले.
Gunratan Sadavarte News
Gunratan Sadavarte Newssaam tv

Gunratan Sadavarte News: सोलापूरातून मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूरात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. सदावर्तेंवर मराठा आंदोलकांनी काळी शाई फेकली आहे. सोलापूरात ते पत्रकार परिषद घेत होते, यावेळी मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषदेत गोंधळ घालत त्यांच्यावर शाईफेक केली आहे. या घटनेचा सदावर्ते यांनी तीव्र निषेध केला आहे. अशा शाईफेक हल्ल्यांनी मी घाबरत नाही असं सदावर्ते म्हणाले. (Solapur Latest News)

Gunratan Sadavarte News
Sanjay Raut: अमृता वहिनी गप्प कशा बसल्या? सणसणीत कानाखाली वाजवायला हवी होती; बाबा रामदेव प्रकरणी संजय राऊत भडकले

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचा आरोप सदावर्तेंनी (Adv. Gunratan Sadavarte) केला आहे. यावेळी ते म्हणाले, संविधान दिनी संविधानाबाबत बोलताना, छत्रपतींबाबत बोलताना अशी शाईफेक करण्यात आली. ही काळी शाई छत्रपतींच्या प्रतिमेवरही पडली. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीसाठी त्यांनी काल उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्यांना विरोध झाला होता. आज सोलापूरमध्ये (Solapur) संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक करत त्यांची पत्रकार परिषद उधळवून लावली आहे.

Gunratan Sadavarte News
अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत; बाबा रामदेव यांच्याकडून कौतुकांचा वर्षाव

मराठा आरक्षण, एसटी बस कर्मचारी आंदोलन आणि आता वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घेतलेली पत्रकार परिषद यातून सदावर्ते हे चर्चेत आले आहेत. या शाईफेक हल्ल्याबाबत संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे म्हणाले की, संभाजी ब्रिगेडनेच ही शाईफेक केलेली आहे. सदावर्ते हे विकृत माणूस आहे. त्यांनी मानसिक उपचारांची गरज आहे. सातत्याने त्यांची विकृती दिसत आलेली आहे. मराठा आरक्षण आंदोलन असो किंवा एसटी बस कर्मचारी आंदोलन असो आणि आता वेगळ्या विदर्भाची मागणी यातून विकृत प्रसिद्धी मिळवायची असा आरोप त्यांनी सदावर्ते यांच्यावर केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com