Manmad Bajar Samiti निवडणुकीत आमदार सुहास कांदे व मविआ कार्यकर्त्यांत राडा; शिवीगाळ, धराधरी...

पाेलिसांनी दाेन्ही गटांवर नियंत्रण मिळवित परिस्थिती नियंत्रणात आणली.
manmad bajar samiti election
manmad bajar samiti electionsaam tv

- अजय साेनवणे

Manmad Market Committee Election News : मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीच्या (manmad bajar samiti) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि किरकाेळ मारामारीच्या घटना घडल्या. पाेलिसांनी वेळेत ठाेस पावलं उचलल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीतील माेठं रणसंग्राम टळलं. (Breaking Marathi News)

manmad bajar samiti election
Kabbadi च्या वादातून अख्खं गाव एकवटलं; 24 तासांत हल्लेखाेरास अटक करा, अन्यथा सगळ्या बायका मिळून घरात घुसू.., पाेलिसांना दिलं आव्हान

मनमाड बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ही निवडणुक आपल्या गटाला साेपी जावी यासाठी विविध पक्षातील कार्यकर्ते तसेच नेते मंडळी प्रयत्न करीत आहेत. त्यातूनच काही ठिकाणी वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

manmad bajar samiti election
Prithviraj Chavan News : मुख्यमंत्री करायचं अन् दुधातल्या माशी सारखं फेकून द्यायचं हे याेग्य नाही : पृथ्वीराज चव्हाण

आज ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक आणि आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. यावेळी दाेन्ही गटाकडून शिवीगाळ, मारहाणीचा प्रकार झाला. हे सर्व तहसीलदार आणि पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याची चर्चा आहे.

दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने तब्बल अर्धातास त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरु होता. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगविले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणाव मात्र कायम आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com