अट्टल गुन्हेगारांच्या दोन गटात तुफान हाणामारी; एकाचा खून !

जालना जिह्यातील अंबड तालुक्यातील भार्डी गावात गुन्हेगारांच्या दोन टोळीत देवाण घेवाणीतून तुफान राडा झाला आहे. यात एकाच्या पाठीत चाकू खुपसून त्याचा खून करण्यात आल्याने परिसरात एकाच खबळ उडाली आहे.
अट्टल गुन्हेगारांच्या दोन गटात तुफान हाणामारी; एकाचा खून !
अट्टल गुन्हेगारांच्या दोन गटात तुफान हाणामारी; एकाचा खून !लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना जिह्यातील अंबड तालुक्यातील भार्डी गावात गुन्हेगारांच्या दोन टोळीत देवाण घेवाणीतून तुफान राडा झाला आहे. यात एकाच्या पाठीत चाकू खुपसून त्याचा खून करण्यात आल्याने परिसरात एकाच खबळ उडाली आहे. Fighting between two groups of hardened criminals; Murder of one!

अंबड तालुक्यातील भार्डी गावातील गुन्हेगारी प्रवृती असलेल्या दोन गटात चोरीच्या दुचाकींच्या पैशाच्या वादातून शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाद झाला. या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत होऊन, दोन्ही गटाकडून धारधार शस्त्र आणि लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरु झाली. या वादामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटाच्या अर्जुन भुजंग पवार याच्या पाठीत चाकू खुपसून वार केल्याने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अर्जुन यांचा जागीच मृत्यु झाला.

हे देखील पहा -

घटनेची माहिती मिळताच अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके, पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन आरोपी शरद पवार आणि रामेश्वर मोरे दोन जणांच्या ताब्यात घेण्यात यश आले आहे. दोन्ही गटातील अन्य आरोपी मात्र फरार झाले आहेत.

अट्टल गुन्हेगारांच्या दोन गटात तुफान हाणामारी; एकाचा खून !
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी भागात ढगफुटी !

या प्रकरणी कुलदीप अर्जुन पवार यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे व खून केल्या प्रकरणी गोदि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ करीत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com