पाणी पूजनावरून आजी- माजी आमदारांचे समर्थक भिडले

पाणी पूजनावरून आजी- माजी आमदारांचे समर्थक भिडले
fighting

पंढरपूर : दहिगाव उपसा सिंचन योजनेतून तलावात सोडलेल्या पाण्याच्या पूजनावरुन करमाळा येथील शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील आणि अपक्ष आमदार संजय शिंदे या दाेन गटात मारामी झाली. या दाेन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविराेधाेत पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. fighting-between-two-political-groups-Karmala-Pandharpur-Political-news-sml80

fighting
आरोपींना अटक का नाही? महाराष्ट्र बंद राजकीय नव्हे : संजय राऊत

देगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी कोंढेजच्या तलावात सोडले आहे. या तलावातील पाण्याच्या पूजनाचा कार्यक्रमासाठी सेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते गेले हाेते. तेथे आमदार संजय शिंदे यांच्या गटाचे समर्थक देखील हाेते. तलावात सोडण्यात आले आलेल्या पाण्याच्या श्रेयवादातून दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. या मारामारीत दोन्ही गटाचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान देगाव उपसा सिंचन योजनेच्या करमाळा तालुक्यातील पाणी पूजना वेळी झालेल्या मारामारीचे पडसाद तालुक्यात उमटले. या प्रकरणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.