
Beed News : योगगुरू रामदेव बाबा यांनी भर सभेत म्हणाले की बाईने कपडे नाही जरी घातले तरी ती चांगली दिसते. यावर रामदेव बाबावर 354 चा खटला दाखल झाला पाहिजे. मात्र त्यांच्यावर कोणीच गुन्हा दाखल केला नाही. मात्र उर्फी विषयचर्चा सुरू आहेत का तर ती जावेद आहे म्हणून.
केवळ जावेद आहे म्हणून उर्फीला टार्गेट केलं जात आहे. असं म्हणत शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदेव बाबांसह भाजप (BJP) नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. त्या बीडच्या माजलगावमध्ये मूकनायक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, की भगव्या कापड्यावरून वादळ उठवले जात आहे. कारण ते खान आहेत म्हणून मात्र नवनीत अक्कनी भगवे परिधान करून गाणं शूट केले. मात्र त्यांच्यावर काहीच आक्षेप नाही का ? तर तिच्या नावासमोर खान, पठाण, शेख असे नाही म्हणून.
त्या पुढे म्हणाल्या की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अद्याप एक ही पत्रकार परिषद का घेतली नाही ? हे कोणीच का लिहिले नाही ? आज शाही फेकली की 307 अन तलवारीने माणसे कापली तरी 307 असं का ? असा सवाल ही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
एक महिला स्वच्छेने आपले कपडे घालते आणि कपडे काढते. मात्र यांना या विषयावर अनेक पत्रकार परिषदा घ्याव्या लागतात. मात्र ज्या विषयी बोलले पाहिजे त्या विषयाला कधीचं हात घातला जात नाही हे का होत नाही ? यावर कधी लिहिल जाणार ? असे एक ना अनेक विषय धरून सध्य परिस्थितीवरुन अंधारे यांनी हल्लाबोल केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.