अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा!
अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा!SaamTvNews

अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा!

अकोल्यातील अकोट - शेगाव मार्गावर रात्री झालेल्या अपघातात परतवाडा येथील चार जणांचा मृत्यू झाला.

अकोला : अकोल्यातील अकोट - शेगाव मार्गावर रात्री झालेल्या अपघातात परतवाडा येथील चार जणांचा मृत्यू झाला. हा अपघात नॅशनल हायवे व वन विभाग यांचा समन्वय नसल्याचा आरोप करत या अपघातास दोषींवर कारवाई करण्याची मागणी अकोट (Akot) येथील सर्वपक्षीय नेते आणि पत्रकार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे केलीय.

हे देखील पहा :

तर, भाजप आमदार रणधीर सावरकर (Randhir Savarkar) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत जबाबदारी निश्चित करून गुन्हे (Case) दाखल करण्याची मागणी केलीय. जिल्ह्यातील अनेक रस्ते (Road) शासकीय कार्यालयाच्या समन्वय नसल्यामुळे थांबलेले आहेत. याचा शोध घ्या व सर्व कामे सुरू करा, अन्यथा रस्त्यावर यावे लागेल असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला आहे.

अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा!
अहो आश्चर्यम! बीडमध्ये म्हशीने दिला आठ पायांच्या रेडकाला जन्म

तर, अकोट येथील सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त करत उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकाऱ्यांनी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्याची तातडीची मिटींग घेऊन तात्काळ काम सुरू करण्याबाबत चर्चा केली व तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अपघातात (Accident) मृत्युमुखी पडलेल्या मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com