नागपूर मधील वाडीच्या माजी महिला नगरसेवकांविरूद्ध गुन्हा दाखल

माजी नगरसेविका सरिता यादव यांनी मारहाण केलेल्या मुलाच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली आणि टँकरमध्ये तुकडे करून फेकेल अशी धमकी दिली
नागपूर मधील वाडीच्या माजी महिला नगरसेवकांविरूद्ध गुन्हा दाखल
नागपूर मधील वाडीच्या माजी महिला नगरसेवकांविरूद्ध गुन्हा दाखलSaam Tv

मंगेश मोहिते

नागपूर : शहरातील दत्तवाडीच्या शिवशक्ती नगरमध्ये एका माजी महिला नगरसेविकेने एका तरुणाला घरात डांबून बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी वाडी पोलिसांनी महिला नगरसेविके विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवशक्ति नगरात राहणारा पीडित करण जितेंद्र डोर्ले (वय- १७) हा गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी दुकानात सामान आणायला जात होता. नगरसेविका सरिता यादव यांच्या पीडित तरुणाला घरी बोलवले. तो गेला असता.

हे देखील पहा-

त्याला घरात बंद करण्यात आले. यादव कुटुंबाने डीजेचा आवाज मोठा केला आणि पीडित करणला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. माजी नगरसेविका सरिता यादव, तिचा नवरा यांच्यासह इतर ३ युवकांनी मारहाण केलीआहे. पीडित करणच्या शरीरभर मारहाणीच्या जखमा झाले आहेत. त्याला गळ्यावर, पाठीवर, पायांवर लोखंडी आणि लाकडी रॉडने जखम झाली. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मारहाण शेजाऱ्यांना घरात ऐकू आली नाही.

नागपूर मधील वाडीच्या माजी महिला नगरसेवकांविरूद्ध गुन्हा दाखल
Breaking: LJPचे खासदार प्रिन्स राज, यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

करण जेव्हा आपला जीव वाचवून घरी आला. तेव्हा त्याने घटनेची संपूर्ण हकीकत त्याच्या आईला सांगितली. माजी नगरसेविका सरिता यादव यांनी करणच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. टँकरमध्ये तुकडे करून, फेकेल अशी धमकी दिली होती. भीतीने पीडित तरुणाच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली नव्हती. पण नंतर तक्रार दाखल केल्यावर ही पोलिसांनी टाळाटाळ केली. पण शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com