13 मजुरांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कामगार कंत्राटदारावर, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

टिप्पर पलटी होऊन 13 निष्पाप मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती याप्रकरणी पोलिस तपासात कामगार कंत्राटदार दोषी आढळल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
13 मजुरांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कामगार कंत्राटदारावर, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
13 मजुरांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कामगार कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलSaamTV

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील काम करणारे मजूर सिंदखेड राजा तालुक्यातील तडेगाव येथे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी माल वाहू टिप्पर मध्ये बसून परत येत असताना हे टिप्पर पलटी होऊन यामध्ये 13 निष्पाप मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याप्रकरणी टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली, तर पुन्हा पोलिस तपासात कामगार कंत्राटदार हा देखील जबाबदार आढळल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले दरम्यान त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर या प्रकरणी किनगाव राजा पोलीस अजूनही तपास करत असून यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे.Filed a case of culpable homicide against a labor contractor

हे देखील पहा-

समृद्धी महामार्गाचे काम हे जवळपास 70 टक्के पूर्णत्वास गेले असून, सिंदखेड राजा तालुक्यातील पॅकेज क्रमांक सात मधील बांधकाम सहाय्यक कंत्राटदार रोडवेज सोल्युशन इंडिया कंपनी च्या माध्यमातून सुरू आहे, त्या कामावर मध्य प्रदेशातील मजूर कार्यरत होते, हे मजूर पावसामुळे काम बंद पडल्याने टिप्पर मध्ये अवैधरित्या बसून आणले गेले, आणि एका वाहनाला साईट देताना टिप्पर पलटी होऊन यामधील लोखंडी सळई खाली दबून 13 मजुरांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे, या संपूर्ण घटनेची आरटीओ कार्यालयामार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये टिप्पर चालकाचा आणि मालवाहू टिप्पर चा परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे.

13 मजुरांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कामगार कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
कोरोना काळात रुग्णसेवा करणाऱ्या, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना रातोरात केले कार्यमुक्त

समाजमन हेलाऊन टाकणाऱ्या या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, मात्र या मजुरांना अनिवार्य असलेल्या सर्व मूलभूत सोयीसुविधा मिळतात का, याची देखील चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, सोबतच अशी दुर्दैवी घटना पुन्हा होऊ नये यासाठी आणि झालेल्या या घटनेला संबंधित प्रोजेक्ट मॅनेजर जबाबदार असून त्यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलीस विभागासह कार्यकारी अभियंता समृद्धी महामार्ग यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण गंभीर प्रकरणाची प्रशासनाकडून कसून चौकशी केल्या जात असून यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com