
सांगली - नवऱ्याशी घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे वचन देत मिरजेतील पायलटला 58 लाख 92 हजार रुपयेला नोयडाच्या महिलेने गंडा घातला. पैसे परत मागितले असता महिलेने पायलटच्या आईला फोन करून अडकविण्याची धमकी दिली. याप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस (Police) ठाण्यात संबंधित महिलेविरुध्द फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आतिश शिंगे हे पायलट आहेत.
मिरजेतील अतिश शिंगे एका विमान कंपनीत पायलेट आहेत. त्यांची संशयित महिलेसोबत ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. महिलेने त्यांना आपण विवाहित असून पहिल्या पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर तात्काळ लग्न करू असे सांगितले. तसेच स्वतःला देखील पायलट बनण्यासाठी अतिश यांच्याकडे पैशाची मागणी केली.
हे देखील पाहा -
पायलट झाल्यानंतर घेतलेली रक्कम जमिनीची विक्री करून परत देतो असे सांगितले. तसे न झाल्यास जमीन अतिश यांच्या नावावर करून देतो असे आश्वासन दिले. महिलेच्या वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीतुन मिळणाऱ्या 12 कोटी रकमेतील रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अतिश यांनी महिलेच्या खात्यावर वेळोवेळी 58 लाख 92 हजार रुपये दिले. ही रक्कम 98 हजार दोनशे एक अमेरिकन डॉलर स्वरूपात होती.
शिंगे यांनी काही कालावधीनंतर महिलेकडे वारंवार पैशाची मागणी केली. परंतु महिलेने ते पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. पैसे परत न दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे अतिश त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अतिशने याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले. पण महिलेने अतिशच्या आईला फोन करून पोलिसात तक्रार करू नका अन्यथा अतिश यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.