दापोली पोलीस स्टेशनला भीषण आग; महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती
रत्नागिरी: दापोली (Dapoli) पोलीस स्टेशनला भीषण आग (Fire) लागली आहे. दापोली पोलीस स्टेशनच्या मुख्य इमारतीला पहाटेच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी पोहोचले. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण सध्या कळू शकलेले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत पोलीस ठाण्यात असलेले महत्वाचे दस्ताऐवज जळून खाक झाल्याची भिती वर्तवण्यात येत आहे. (Fire at Dapoli police station; Fear of burning important documents)
हे देखील पाहा -
आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या बंदुका आणि काही दस्ताऐवज बाहेर काढण्यात दापोली पोलीसांना यश आलं. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग तत्काळ पोहोचले घटनास्थळी आहेत.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.