Fire Breaks Out In Kamala Building: मसिना, वोक्हार्ड आणि रिलायन्सने रुग्णांना नाकारलं, कारवाईचे आदेश देणार - महापौर

मुंबईतील ताडदेव परिसरातील बहुमजली कमला इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 15 जण जखमी झाले.
Fire Breaks Out In Kamala Building: मसिना, वोक्हार्ड आणि रिलायन्सने रुग्णांना नाकारलं, कारवाईचे आदेश देणार - महापौर
Fire Breaks Out In Kamala BuildingSaam Tv

मुंबई : मुंबईतील ताडदेव परिसरातील बहुमजली कमला इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 15 जण जखमी झाले. मात्र, या जखमींवर उपचार करण्यास मसिना, वोक्हार्ड आणि रिलायन्स या रुग्णालयांनी नकार दिला. त्यामुळे त्यांनी भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे अत्यंत धक्कादायक असून रुग्णांना नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे (Fire Breaks Out In Kamala Building Masina, Wockhardt And Reliance Hospitals Refused To Take Injured Patients).

Fire Breaks Out In Kamala Building
Fire In Mumbai: मुंबईतील ताडदेवमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, 15 जण जखमी, आकडा वाढण्याची भीती

कमला इमारतीच्या 18 व्या मजल्यावर भीषण आग

मुंबईत (Mumbai) ताडदेव परिसरातील कमला इमारतीच्या 18 व्या मजल्यावर आज सकाळी भीषण आग लागली. या घटनेत 15 जण जखमी (Injured) झाले आहेत, तर तिघांवर पालिकेच्या भाटिया रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

मसिना, वोक्हार्ड आणि रिलायन्स यांनी रुग्णांना नाकारलं

धक्कादायक बाब म्हणजे जखमींना वाचवल्यानंतर त्यांना जवळील मसिना, वोक्हार्ड आणि रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. मात्र या तीनही रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. त्यांना नायर (Nair Hospital) अथवा पालिकेच्या रुग्णालयात घेऊन जा, असं या रुग्णालयांनी सांगितलं. त्यामुळे या जखमींना पालिकेच्या भाटिया रुग्णालयात दाखल करावं लागलंय. अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या रुग्णाला मुंबईसारख्या शहरात जर उपचार नाकारले जात असतील तर हे अत्यंत गंभीर आहे.

रुग्णालयांवर कारवाई करणार - महापौर

यावर बीएमसीच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही संताप व्यक्त केला आहे. नकार देणाऱ्या या तीनही रुग्णालयांवर कारवाई करण्यास आयुक्तांना आपण सांगणार असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com