प्लास्टिकच्या गाेदामास आग; जिवितहानी टळली,मालमत्तेचे नुकसान

प्लास्टिकच्या गाेदामास आग; जिवितहानी टळली,मालमत्तेचे नुकसान
fire

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली परिसरात महामार्ग पोलिस चौकीच्या समोर एका प्लास्टिकच्या गाेदामास रात्री दोनच्या सुमारास लागलेली आग fire विझविण्यात अग्नीशमन विभागास यश आले आहे. ही भीषण आग विझविण्यासाठी तब्बल १५ पाण्याचे टॅंकर लागले.

या परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. संबंधित गोदाम बंद हाेते. त्या ठिकाणी कामगार नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

fire
त्यांचे हे असं वागणं म्हणजे काेराेनाला आमंत्रण : संजय राऊत

या गाेदामात प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा माेठ्या प्रमाणात हाेता. त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. चाळीसगाव रस्ता ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. 

या भागात आजूबाजूला माेठी गॅरेजची दुकाने आहेत. या भागात आग पसरु नये यासाठी अग्निशमन दलाने खबरदारी घेतली. या घटनेत काेणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसली तरी स्थावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com