Mangalvedha Fire News : मंगळवेढयातील खटावकर माॅलला भीषण आग

या भीषण आगीची बातमी पंढरपूर जिल्ह्यात सर्वदूर पाेहचली.
pandharpur news, mangalvedha khatavkar mall
pandharpur news, mangalvedha khatavkar mallsaam tv

Pandharpur News : पंढरपूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे एका माॅलला आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास भीषण लागली आहे. या आगीची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी फायर ब्रिगेडला दूरध्वनी करुन आगीची माहिती दिली. (Maharashtra News)

pandharpur news, mangalvedha khatavkar mall
Pankaja Munde In Kolhapur : देवी आई..., दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ नये : पंकजा मुंडे (पाहा व्हिडिओ)

मंगळवेढा येथील‌ खटावकर माॅलला आग लागल्याचे कळताच काही नागरिकांनी माॅलच्या दिशेने धाव घेतली. माॅलच्या वरच्या भागास आग लागल्याने हवेत धूराचे लाेट पसरले हाेते. ही आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न सुरू केले.

pandharpur news, mangalvedha khatavkar mall
Bharat Or India? संभाजीराजे दिल्लीत दाखल, इंडिया शब्द बदलून भारत करणार असाल तर... (पाहा व्हिडिओ)

ही आग माेठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांचे प्रयत्न कमी पडले. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत खटावकर माॅलचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. या भीषण आगीची बातमी पंढरपूर जिल्ह्यात समाज माध्यमातून पसरली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com