राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नितीन बिक्कड यांच्या गाडीवर गोळीबार; थोडक्यात बचावले

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Osmanabad News
Osmanabad NewsSaam Tv

कैलास चौधरी

उस्मानाबाद - राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड (Nitin Bikkad) यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. नितीन बिक्कड यांच्या गाडीवर 2 गोळ्या झाडण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एक गोळी ही गाडीच्या पुढील काचावर लागली आहे तर एक गोळी ड्राइवर सीटच्या बाजूला लागली आहे. सुदैवाने गाडीतील सगळे जण सुखरूप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पाहा -

हा हल्ला नेमका कुणी केला आणि हल्लेखोर कोण होते? याची माहिती मिळू शकलेली नाही. याचीही ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. वाशी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. या प्रकरणी आता पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या जीवघेण्या हल्ल्यात बिक्कड हे बचावले आहेत. पारा -फक्राबाद रोडवर नितीन बिक्कड त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Osmanabad News
'बा'ची शतकपूर्ती; पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पेट्रोल पंपाच्या कामानिमित्ताने नितीन बिक्कड हे अशोक शिनगारे यांच्या भेटीसाठी गावात गेले होते.त्यानंतर शिनगारे यांनी घरीच भेटण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे नितीन बिक्कड हे त्यांच्या घराकडे निघाले होते. यावेळी येताळ इथं पोहोचले असताना दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले आणि त्यांनी काच खाली करण्यास सांगितले. त्यातील एका तरुणाने गाडीच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील एक गोळी ही गाडीच्या पुढील काचावर लागली आहे तर एक गोळी ड्राइवर सीटच्या बाजूला लागली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com