Kolhapur: कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड! पहिली आंब्याची पेटी धनंजय महाडिकांच्या घरात; खरेदीचा आकडा ऐकून चक्रावून जाल

यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वाधिक बोली ही कोल्हापुरात लागली असून कोल्हापुरातील पहिला आंबा हा खासदार धनंजय महाडिक यांच्या घरात गेला आहे.
Kolhapur
KolhapurSaamtv

Kolhapur: आंब्याला फळांचा राजा का म्हणतात याचीच प्रचिती कोल्हापुरात पाहायला मिळाली. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा शनिवारी दाखल झाला. कोल्हापूरकरांनी या हापूस आंब्यासाठी लावलेली बोली आजवरच्या इतिहासातील मोठी बोली ठरली. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला तब्बल 51 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सौद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे.

Kolhapur
Delhi Car Accident: दिलदार किंगखान! दिल्ली अपघातातील मुलीच्या कुटूंबियांना शाहरुख करणार मदत, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा आज दाखल झाला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला ५१,००० रुपयांचा दर निघाला. पहिला सौदा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते काढला.कोल्हापुरात साधरत: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आंब्याची आवक सुरू होते.

मात्र यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. कुंभारमठ (ता. देवगड) येथील शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांचा हापूस आंबा खासदार धनंजय महाडिक यांनी बोली लावत ५१,००० खरेदी केला असून राज्यातील यावर्षीचा सर्वात उच्चांकी दर हा कोल्हापुरात मिळाला आहे.

Kolhapur
Viral Video: मुलीने केला असा व्यायाम की जिम ट्रेनर हादरला; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

यंदाच्या हंगामातील पहिला आंबा कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला याचा लिलाव आज सकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडला 5000 रुपयापासून सुरू झालेला दर हा तब्बल 51 हजार रुपयापर्यंत पोहोचला. सदर लिलावात खासदार धनंजय महाडिक यांनी देखील बोली लावत तब्बल 51 हजार रुपयाला आंबा खरेदी केला.

यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वाधिक बोली ही कोल्हापुरात लागली असून कोल्हापुरातील पहिला आंबा हा खासदार धनंजय महाडिक यांच्या घरात गेला आहे. पाच डझनाला सुमारे एकावन हजार रुपये दर मिळाल्याने एका डझनाचा दर कमीत-कमी दहा हजार दोनशे रुपये होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन दर आवाक्यात येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com